शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

युवकांना मिळाली नवी दिशा

By admin | Updated: February 3, 2015 01:00 IST

विदर्भात रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी तसेच युवकांना उद्यमशीलतेकडे नेण्यासाठी कौशल्य आधारित विविध चर्चासत्र, विविध उद्योगांमध्ये यशोशिखरावर गाठलेल्या व्यक्तिमत्त्वाच्या

उत्स्फूर्त सहभाग : २५ हजारावर तरुणांनी केली नोंदणी नागपूर : विदर्भात रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी तसेच युवकांना उद्यमशीलतेकडे नेण्यासाठी कौशल्य आधारित विविध चर्चासत्र, विविध उद्योगांमध्ये यशोशिखरावर गाठलेल्या व्यक्तिमत्त्वाच्या मार्गदर्शनातून तसेच शासकीय व विविध संस्थांनी लावलेल्या स्टॉल्सच्या माध्यमातून नव्या संधी युवकांसाठी उपलब्ध करून देणाऱ्या ‘युथ एम्पॉवरमेंट समिट’मधून युवकांना उद्यमशीलतेची नवी वाट मिळाली. विदर्भ फॉर्च्युन फाऊंडेशनच्या वतीने मानकापूर येथील स्पोर्ट्स स्टेडियम परिसरात आयोजित ‘युथ एम्पॉवरमेंट समिट’चा सोमवारी समारोप करण्यात आला. तीन दिवस चाललेल्या या समिटमध्ये विदर्भातील विविध जिल्ह्यांसह छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातूनही तरुण आले होते. २५ हजारावर तरुणांनी प्रत्यक्ष नोंदणी करून घेतली. या समिटमध्ये विविध विषयांवर एकूण २० चर्चासत्रे झाली. यात ५० च्यावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनाचा लाभही तरुणांनी घेतला. तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विदर्भ फॉर्च्युन फाऊंडेशनचे अध्यक्ष आ. अनिल सोले यांच्यासह विजय फडणवीस, नवनीतसिंग तुली, संदीप जाधव, जयंत पाठक, विकास बुंदे, प्रशांत कांबळे, शैलेश ढोबळे, सतीश वडे, जयहरी सिंग ठाकूर, रूपा राय, वर्षा ठाकरे, अ‍ॅड. सोनल राऊत, मंजूषा किचनबरे, बबली मेश्राम, दिलीप गौर, चेतन बंदिरगे आदींनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)आता नोकरी नाही उद्योग उभारू आम्ही केवळ नोकरी मिळविण्यासाठी शिकलो पाहिजे, असे आम्हाला आजवर वाटत होते. एवढे शिक्षण घेऊनही नोकरी मिळाली नाही तर काय होईल, हीच चिंता लागली होती. पण आता नोकरीच्या मागे लागायचे नाही. स्वत:च्या पायावर उभे राहायचे. स्वत:चा उद्योग उभारायचा आणि आपल्यासारख्याच शेकडो युवकांना रोजगार उपलब्ध करून द्यायचा, ही प्रेरणा युथ एम्पॉवरमेंट समिटमधून आम्हाला मिळाली, असा निर्धार शेकडो तरुणांनी व्यक्त केला.