पवारांचा दौरा घेणार नव्या अध्यक्षांची परीक्षा

By Admin | Updated: September 20, 2015 03:08 IST2015-09-20T03:08:06+5:302015-09-20T03:08:06+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार २३ व २४ सप्टेंबर रोजी विदर्भ दौऱ्यावर येत आहेत. पवारांचा हा दौरा नवनियुक्त शहर व जिल्हाध्यक्षांची परीक्षा घेणारा ठरणार आहे.

The new chairman will take a tour of Pawar | पवारांचा दौरा घेणार नव्या अध्यक्षांची परीक्षा

पवारांचा दौरा घेणार नव्या अध्यक्षांची परीक्षा

शहर व जिल्ह्याची बैठक : संघटन बळकट करण्याचे आवाहन
नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार २३ व २४ सप्टेंबर रोजी विदर्भ दौऱ्यावर येत आहेत. पवारांचा हा दौरा नवनियुक्त शहर व जिल्हाध्यक्षांची परीक्षा घेणारा ठरणार आहे. याची जाणीव असल्यामुळे नवनियुक्त दोन्ही अध्यक्ष जोमाने कामाला लागले आहेत. शनिवारी गणेशपेठेतील पक्ष कार्यालयात तयारीसाठी झालेल्या बैठकीत याचा प्रत्यय झाला. बऱ्याच दिवसानंतर राष्ट्रवादीचे पक्ष कार्यालय ‘हाऊस फुल’ झाल्याचे पहायला मिळाले.
शरद पवार २३ सप्टेंबर रोजी यवतमाळ जिल्ह्यातील पिंपरी बुटी येथे शेतकऱ्यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत.
२४ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता नागपुरात कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतील. त्यानंतर दुपारी २ वाजता विदर्भातील पदाधिकाऱ्यांचा देशपांडे सभागृहात मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या दोन दिवसीय दौऱ्यासाठी राष्ट्रवादी कामाला लागली आहे. शनिवारी नवनियुक्त शहर अध्यक्ष माजी मंत्री अनिल देशमुख व जिल्हाध्यक्ष माजी मंत्री रमेश बंग यांनी पक्ष कार्यालयात शहर व ग्रामीण पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची स्वतंत्र बैठक घेतली. दोन्ही बैठकांना देशमुख व बंग उपस्थित होते. न येणारे कार्यकर्तेही आज पक्ष कार्यालयात पोहचले होते. बऱ्याच दिवसांनी पक्ष कार्यालय खचाखच भरले. या वेळी दोन्ही नेत्यांनी पक्ष संघटना मजबूत करा, शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडा, असे आवाहन केले.
दोन्ही बैठकांना आ. प्रकाश गजभिये, दीनानाथ पडोळे, माजी शहर अध्यक्ष अजय पाटील, माजी जिल्हाध्यक्ष बंडू उमरकर, अतुल लोंढे, प्रगती पाटील, राजू नागुलवार, वेदप्रकाश आर्य, प्रवीण कुंटे, नुतन रेवतकर, राजाभाऊ टाकसाळे, अविनाश गोतमारे, गंगाप्रसाद ग्वालबंसी, रमण ठवकर, दीप्ती काळमेघ, सतीश इटकेलवार, विशाल खांडेकर, शब्बीर विद्रोही, शैलेंद्र तिवारी, ईश्वर बाळबुधे, वर्षा शामकुळे, अशोक काटले, राजेश माटे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: The new chairman will take a tour of Pawar