Nitin Gadkari's Birthday: नितीन गडकरींचे घर आनंदले! वाढदिवसाच्या दिवशीच निवासस्थानी चिमुकल्या नातीचे पाय लागले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2021 18:15 IST2021-05-27T18:14:50+5:302021-05-27T18:15:54+5:30
Nitin Gadkari's Birthday: नितीन गडकरी यांचे औक्षण करण्यात आले. यावेळी लाडाची नात ही नितीन गडकरी यांच्याकडेच होती. मोठे चिरंजीव निखिल यांना कन्यारत्न झाले.

Nitin Gadkari's Birthday: नितीन गडकरींचे घर आनंदले! वाढदिवसाच्या दिवशीच निवासस्थानी चिमुकल्या नातीचे पाय लागले
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचा आज वाढदिवस आहे. देशभरातील सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते नितीन गडकरी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे. तर वाढदिवसाच्या दिवशी नितीन गडकरी यांच्या घरी नातीचे आगमन झाले. (new born Grand Daughter came on Nitin Gadkari Birthday at his home.)
नितीन गडकरी यांचे मोठे चिरंजिव निखिल यांना कन्यारत्न झाले. आज नितीन गडकरी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी लाडक्या नातीचे निवासस्थानी आगमन झाले. त्यामुळे घरी एकच आनंदाचे वातावरण पसरले. नितीन गडकरी यांचे औक्षण करण्यात आले. यावेळी लाडाची नात ही नितीन गडकरी यांच्याकडेच होती.
घरातील छोट्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी एकत्र येत यावेळी धम्माल केली. बच्चे कंपनींनी आपल्या छोट्याशा हातांनी तयार केलेले वाढदिवसाचे खास ग्रिटिंग कार्ड नितीन गडकरींना दिलं. त्यांनीही मोठ्या उत्सुक्तेनं बच्चे कंपनीचं गिफ्ट उघडून पाहिलं. हा आनंदाचा सोहळा कॅमेऱ्यात कैद करण्यात आला.