नवीन २00 बसेस मिळणार

By Admin | Updated: June 1, 2014 00:57 IST2014-06-01T00:57:10+5:302014-06-01T00:57:10+5:30

केंद्र शासनाकडून २00 नवीन बसेस तातडीने उपलब्ध व्हाव्यात, यासाठी महापालिका प्रशासनाने प्रकल्प अहवाल तयार केला आहे.

New 200 buses will be available | नवीन २00 बसेस मिळणार

नवीन २00 बसेस मिळणार

महापालिका : सभापतींनी उपस्थित केले प्रश्न
नागपूर ;  केंद्र शासनाकडून २00 नवीन बसेस तातडीने उपलब्ध व्हाव्यात, यासाठी महापालिका  प्रशासनाने प्रकल्प अहवाल  तयार केला आहे.
 व्यवस्थापकांनी हा अहवाल परिवहन समितीचे सभापती बंडू राऊ त यांच्याकडे अवलोकनासाठी   पाठविला आहे. त्यांनी हा प्रस्ताव स्थायी समितीकडे पाठविण्याचा सल्ला दिला आहे. सोबतच  नवीन बसेस संदर्भात परिवहन व्यवस्थापकांना  काही प्रश्न विचारले आहे.
केंद्र शासनाने नवीन बसेसचा विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करून तो पाठविण्याच्या सूचना केल्या  होत्या. त्यानुसार तो तयार करण्यात आला आहे. परंतु मनपा आपला आर्थिक वाटा कसा उचलणार  व सुविधा संदर्भात यात स्पष्टता नसल्याने राऊ त यांनी प्रबंधकांना पत्र पाठविले आहे.
 नवीन बसेसच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यासाठी प्रभारी महापौर जैतुन्नबी अन्सारी यांच्या उपस्थितीत  लवकरच  मनपाची बैठक आयोजित केली जाणार आहे.
केंद्राकडून २00 बसेस मिळणार असल्यातरी यात मनपाला ३0 टक्के  आर्थिक भार उचलावा  लागणार आहे. हा निधी कसा उपलब्ध करणार, अहवालात ७ डेपो प्रस्तावित आहेत. यासाठी  मनपाने कोणत्या जागा निश्‍चित केल्या आहेत तसेच नवीन बसेस क ोण चालविणार आदी मुद्यावर  संभ्रम असल्याचे राऊ त यांनी निदर्शनास आणले आहे. (प्रतिनिधी)
 

Web Title: New 200 buses will be available

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.