अट्टल चाेरटे पाेलिसांच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:10 IST2021-02-14T04:10:21+5:302021-02-14T04:10:21+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : दराेडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच अट्टल चाेरट्यांना कामठी (जुनी) पाेलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून, कार, ...

अट्टल चाेरटे पाेलिसांच्या जाळ्यात
लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : दराेडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच अट्टल चाेरट्यांना कामठी (जुनी) पाेलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून, कार, शस्त्र आणि दराेड्यासाठी लागणारे साहित्य असा एकूण १ लाख १० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई खैरी (वारेगाव) शिवारात शुक्रवारी (दि. १२) मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास करण्यात आली.
आकाश ऊर्फ चिपळ्या ऊर्फ मामा प्रमोद बागडे (३२, रा. जयभीमनगर, कामठी), विनोद रसिका वाघ (२९, रा. रामगड, कामठी), सचिन देवानंद कुमरे (२६, रा. जुनी कामठी, ता. पारशिवनी), शाहीद अली गुलाम अली (२८, रा. बिबी कॉलनी, न्यू येरखेडा, ता. कामठी) व नीरज ऊर्फ लक्की राजू पिल्ले (३०, रा. शास्त्री मंच, कादरझेंडा, कामठी), अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. कामठी (जुनी) पाेलिसांचे पथक शुक्रवारी मध्यरात्री कामठी तालुक्यातील खैरी (वारेगाव) शिवारात गस्तीवर हाेते.
त्यांना या शिवारात एमएच-३१/एएच-०१९९ क्रमांकाची कार संशयास्पद स्थितीत आढळून आली. त्यामुहे त्यांनी ती कार थांबवून कारमधील पाचही जणांची चाैकशी केली आणि कारची झडती घेतली. पाेलिसांना कारमध्ये तलवार, लोखंडी रॉड, चाकू, मिरची पावडर, नायलॉन दोरी आदी साहित्य आढळून आल्याने त्यांनी पाचही जणांना ताब्यात घेतले. शेवटी त्यांनी आपण दराेडा टाकण्यासाठी या भागात फिरत असल्याची माहिती दिल्याने, पाेलिसांनी त्यांना अटक केली आणि त्यांच्याकडून कारसह संपूर्ण साहित्य जप्त केले.
या आराेपींकडून एकूण १ लाख १० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती ठाणेदार विजय मालचे यांनी दिली. त्यांच्याकडून चाेरीच्या इतर घटना उघड हाेण्याची शक्यताही विजय मालचे यांनी व्यक्त केली. याप्रकरणी कामठी पाेलिसांनी भादंवि ३९९ तसेच भारतीय शस्त्र प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. ही कारवाई सहायक फाैजदार तंगराज पिल्ले, महेश कठाणे, पंकज मारसिंगे, गयाप्रसाद वर्मा, शंकर हंबर्डे, रूपेश दीक्षित, विशाल उपटकर यांच्या पथकाने केली.
.................