भाच्याने केली मामाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:09 IST2020-11-28T04:09:44+5:302020-11-28T04:09:44+5:30

किरकोळ वादाचे पर्यवसान : आरोपी गजाआड लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : घरगुती वादातून भाच्याने त्याच्या मामाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण ...

Nephew kills uncle | भाच्याने केली मामाची हत्या

भाच्याने केली मामाची हत्या

किरकोळ वादाचे पर्यवसान : आरोपी गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : घरगुती वादातून भाच्याने त्याच्या मामाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून त्यांची हत्या केली. गुरुवारी रात्री १०.३० च्या सुमारास पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. अतुल धरमदास सहारे (वय ५८) असे मृताचे नाव आहे. ते कुंभारपुऱ्यातील बारसे नगरात राहत होते.

त्यांचा भाचा आरोपी विकास गुणवंत साखरे (वय ३२) सहारे यांच्या घराच्या बाजूलाच राहतो. सहारे हॉटेलमध्ये कामाला जायचे तर आरोपी बेरोजगार आहे. दोघेही गुरुवारी रात्री आपापल्या घरात होते. सहारे दारूच्या नशेत बडबड करत होते. त्यावरून दोघांचा वाद सुरू झाला. दोघे एकमेकांना अश्लील शिवीगाळ करू लागले. बोलता बोलता आरोपी सहारे यांच्या घरात आल्याने त्यांच्यात हाणामारी सुरू झाली. आरोपी विकास साखरेने मामा अतुल सहारे यांना खाली पाडले आणि त्यांच्या तोंडावर, पोटावर, छातीवर लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून त्यांना ठार मारले. या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली. माहिती कळताच पाचपावली पोलिस घटनास्थळी पोहोचले. राजेश अतुल सहारे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विकास साखरेविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

---

पोलिसांच्या माहितीनुसार,

आरोपी विकास याचा काही दिवसांपूर्वी प्रेमभंग झाला, तेव्हापासून त्याचे वर्तन असामान्य आहे. तो शिक्षित असून अस्खलित इंग्रजी बोलतो.

---

पोलीस कन्फ्यूज

सकाळी या घटनेची माहिती देताना पोलिसांनी आरोपी मेव्हणा तर मृत जावई असल्याचे सांगितले होते. रात्री मात्र आरोपी भाचा आणि मृत मामा असल्याचे पोलिसांनी सांगितले.

---

Web Title: Nephew kills uncle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.