शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीसमोर आव्हानांची मालिका; विस्तारापासून अनेक निर्णय होणार
2
आजचे राशीभविष्य : 08 जून 2024; धन व कीर्ती ह्यांची हानी होईल, एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल
3
‘नीट’ निकालाची सीबीआय चौकशी करा, वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांसह ‘आयएमए’ची देखील मागणी
4
तूर्तास राजीनामा नको; शपथविधीनंतर चर्चा करू, गृहमंत्री अमित शाह यांचा देवेंद्र फडणवीस यांना सबुरीचा सल्ला
5
T20 World Cup 2024 : आयर्लंडला हरवून कॅनडानं रचला इतिहास; आता 'लक्ष्य' पाकिस्तान, दिला इशारा
6
विधानसभेला कोकणात सर्व जागा जिंकणार, खासदार सुनील तटकरे यांना विश्वास 
7
केजरीवालांच्या जामीन अर्जाला ईडीकडून विरोध, सबळ पुरावे हाती असल्याचा तपास यंत्रणेचा कोर्टात दावा
8
गो-फर्स्टची तारण जमीन विकून होणार, केवळ ५० टक्क्यांचीच वसुली
9
अस्खलित मराठी बोलणारा नेता झाला बिहारमधून खासदार!
10
‘मोठा भाऊ’वरून पटोलेंना पक्षश्रेष्ठींच्या कानपिचक्या; महाविकास आघाडीत संघर्ष वाढण्याआधीच काँग्रेस सावध
11
राज्यातील ११ खासदारांची हॅट्ट्रिक रोखली; १० जणांना दुसऱ्यांदा संधी नाकारली  
12
शिंदे, फडणवीस, पवार यांची नवी दिल्लीत पटेल यांच्या निवासस्थानी बैठक
13
एअर इंडिया - विस्ताराचे विलीनीकरण अखेर मार्गस्थ
14
राणे बंधूंचा गैरसमज दूर करणार : उदय सामंत
15
आघाडी सरकारमुळे संघाच्या अजेंड्याचे काय होणार? मित्रपक्षांतील ‘बाबू फॅक्टर’मुळे अडथळे येण्याची शक्यता
16
शेअर बाजार घोटाळ्याचा आरोप करणाऱ्या राहुल गांधींनी 'त्या' दिवशी बक्कळ कमाई केली; पाहा...
17
मोदींसोबत वाजपेयींसारखा गेम करू शकतात चंद्राबाबू नायडू?; भाजपा उचलतंय सावध पाऊल
18
ईव्हीएम जिवंत आहे का? म्हणणाऱ्या मोदींना काँग्रेसचे प्रत्युत्तर; म्हणाले, "पुरावे घेऊन तुमच्याकडे..."
19
अजित पवारांनंतर प्रफुल्ल पटेल यांना मोठा दिलासा; ईडीने परत केली १८० कोटींची संपत्ती
20
शेअर मार्केटने मोडला 3 जूनचा रेकॉर्ड; सलग तिसऱ्या दिवशी वादळी वाढ, Sensex 76000 पार...

वाटाघाटी फिस्कटल्या; मनपा कर्मचाऱ्यांचे शुक्रवारी मुंडण आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 11:14 PM

मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही सहाव्या वेतन आयोगाच्या थकबाकीबाबत महापालिका प्रशासन ठोस निर्णय घेत नसल्याने महापालिकेचे कर्मचारी आज शुक्रवारी मुंडण आंदोलन करून निषेध व्यक्त करणार आहे. सुमारे २०० कर्मचाऱ्यांसह आंदोलनात महिला कर्मचारीसुद्धा केस अर्पण करणार आहेत.

ठळक मुद्देसातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही सहाव्या वेतन आयोगाच्या थकबाकीबाबत महापालिका प्रशासन ठोस निर्णय घेत नसल्याने महापालिकेचे कर्मचारी आज शुक्रवारी मुंडण आंदोलन करून निषेध व्यक्त करणार आहे. सुमारे २०० कर्मचाऱ्यांसह आंदोलनात महिला कर्मचारीसुद्धा केस अर्पण करणार आहेत.सहाव्या वेतन आयोगाची ५९ महिन्यांची थकबाकी, ८४ महिन्यांच्या महागाई भत्त्याची थकबाकी तसेच सातवा वेतन आयोग लागू करावा याकरिता महापालिका कर्मचाऱ्यांची समन्वय समिती आंदोलन करीत आहे. मुंडण आंदोलनाची घोषणा यापूर्वीही केली होती. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करून मागण्या सोडविण्याची ग्वाही दिली होती. त्यांनी लेखी पत्रही संघटनेला दिले. त्यामुळे मुंडण आंदोलन स्थगित करण्यात आले होते. १९ फेब्रुवारीला महापालिका मुख्यालयात आयुक्त, भाजपचे पदाधिकारी आणि कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी यांची बैठक झाली. मात्र यात कुठलाही तोगडा निघाला नाही. त्यामुळे २६ फेब्रुवारीला मुंडण आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. आयुक्तांनी गुरुवारी बैठक बोलावल्याने आंदोलन पुन्हा पुढे ढकलण्यात आले होते. या बैठकीतही आयुक्तांनी सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी देण्याबाबत स्पष्ट भूमिका घेतली नाही. त्यामुळे आंदोलन करण्यात येणार आहे.बैठकीस शिक्षक संघाचे अध्यक्ष राजेश गवरे, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुरेंद्र टिंगणे यांच्यासह गौतम गेडाम, देवराव मांडवकर आदी उपस्थित होते.महिलाही कापणार केससंविधान चौकात मोठ्या प्रमाणात मुंडण करण्यास पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. त्यामुळे शिक्षक कर्मचारी अध्यापक भवन येथे सकाळी ९ वाजतापासून तर इतर कर्मचारी त्यांच्या कार्यालयात मुंडण करतील. संविधान चौकात दुपारी १२ वाजता दहा कर्मचारी मुंडण करणार आहेत. यात दोन महिला कर्मचाऱ्यांचाही समावेश राहील.आंदोलन दडपण्याचा प्रयत्नआंदोलन चिरडण्यासाठी शिक्षक दिनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकणाऱ्या शिक्षकांच्या सेवापुस्तिकेवर अनुपस्थितीची नोंद करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहे. विशेष म्हणजे शिक्षकांनी याचा लेखी खुलासा आधीच केला आहे. हा विषय संपला असताना आंदोलनात सहभागी होऊ नये याकरिता नोटीस बजावून अप्रत्यक्षपणे शिक्षकांना धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप शिक्षक संघाचे अध्यक्ष राजेश गवरे यांनी केला.

टॅग्स :Employeeकर्मचारीagitationआंदोलन