शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
2
"56 इंचाची छाती असून, अमेरिकेपुढे झुकतात", राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर निशाणा
3
युक्रेनकडून रशियावर भीषण ड्रोनहल्ला, तुआप्से बंदरात घडवला मोठा विध्वंस, ऑईल टर्मिलन जळाले  
4
PM किसानचा २१वा हप्ता कधी येणार? मोठी अपडेट समोर! 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाहीत २००० रुपये
5
‘सत्याचा मोर्चा’त शरद पवारांचे विधान; शिंदे गटाचे नेते म्हणाले, “५० वर्ष सत्ता भोगली...”
6
“अजित पवार, शेतकऱ्यांनी जीवन संपवावे असे वाटते का तुम्हाला?”; प्रकाश आंबेडकरांचा सवाल
7
मुंबईतील कॉन्सर्टवेळी 'मिस्ट्री मॅन'सोबत दिसली मलायका अरोरा, नेटकरी म्हणाले, "अर्जुनपेक्षा भारी..."
8
"मोदी आणि अमित शाह यांना तर हरवू शकत नाहीत, म्हणून..."; खर्गेंच्या संघावरील बंदीच्या मागणीवर बाबा रामदेव यांची तिखट प्रतिक्रिया
9
IND-W vs SA-W Final : टॉस आधी पावसाची बॅटिंग! मेगा फायनलमध्ये ५०-५० षटकांचा खेळ होणार का?
10
रेखा झुनझुनवाला यांची हिस्सेदारी असलेल्या कंपनीला मोठी ऑर्डर; शेअर्स रॉकेट वेगाने धावणार?
11
तंत्रज्ञानाची किमया! चित्रपट पाहत असताना...; Apple वॉचमुळे वाचला २६ वर्षीय तरुणाचा जीव
12
‘सत्याचा मोर्चा’वरून आयोजकांवर गुन्हा दाखल; मनसेची पहिली प्रतिक्रिया आली, भाजपावर टीका
13
आर्थिक व्यवहारावरून वाद, राष्ट्रवादीच्या नेत्याने रोखली शिंदे सेनेच्या नेत्यावर बंदूक
14
Crime: कुटुंबासाठी काळ ठरला नवरा; बायको मुलीसह नातेवाईकाचा विळ्याने चिरला गळा, कारण काय?
15
तुमच्या बचतीवर बक्कळ नफा! ही घ्या ३ वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँकांची यादी
16
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
17
पत्नीला द्यायचं होतं सरप्राइज, पानवाल्याने जमवली १ लाखाची नाणी, सोनाराकडे गेला, त्यानंतर...   
18
Video - अडीच वर्षांचा मुलगा खेळताना आली स्कूल व्हॅन अन्...; काळजात चर्र करणारी घटना
19
तुमच्या जुन्या बँक खात्यात पैसे विसरलात का? RBI ने सांगितला फक्त ३ स्टेप्सचा सोपा मार्ग
20
नात्याला काळीमा ! दीराने वहिनीचे दोन्ही हात पकडून ठेवले अन् पतीने कापला गळा...

नीट गोंधळ; नॅशनल टेस्टिंग एजन्सीला न्यायालयाची नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 16:06 IST

विद्यार्थ्यांना कमी वेळ : १६ पर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक नीट परीक्षेत वेळ कमी मिळाल्याच्या तक्रारीच्या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने परीक्षा घेणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) ला नोटीस बजावली आहे. १६ जूनपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

नीटच्या या गोंधळाविषयी नागपूरची मृण्मयी प्रतीक पाटील या विद्यार्थिनीने न्यायालयात याचिका दाखल केली होती. एनटीएतर्फे यावर्षी यावर्षी ४ मे रोजी नीटची परीक्षा घेतली होती. मिळालेल्या माहितीनुसार, मृण्मयीने अमरावतीत डॉ. पंजाबराव देशमुख विधि महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर परीक्षा दिली होती. याचिकेनुसार परीक्षेदरम्यान केंद्रावर झालेल्या त्रुटीमुळे परीक्षार्थीना ठराविक वेळेपेक्षा २० मिनिटे कमी मिळाले होते.

याबाबत मृण्मयीने १२ मे रोजी एनटीएकडे तक्रारही केली होती. त्यावर १९ मे रोजी प्रतिक्रिया देताना योग्य ती चौकशी करून कार्यवाही करण्याचे आश्वासन एनटीएने दिले होते. मात्र, १० दिवस लोटल्यानंतरही काहीच कार्यवाही न झाल्याने मृण्मयीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर न्या. अनिल किलोर व न्या. प्रवीण पाटील यांनी मंगळवारी सुनावणी घेतली.

मध्य प्रदेश न्यायालयात 'नीट'बाबत ३० याचिकाविशेष म्हणजे नीट परीक्षेत दरवर्षी होणाऱ्या गोंधळाचे सत्र यंदासुद्धा कायम होते. यावर्षी झालेल्या नीट परीक्षेच्या अनियमिततेबाबत मध्य प्रदेश उच्च न्यायालयात ३० च्या जवळपास याचिका दाखल आहेत. न्यायालयाने तेथील काही परीक्षा केंद्रांच्या निकालावर स्थगिती दिली आहे. दुसरीकडे मद्रास उच्च न्यायालयातही नीट परीक्षेबाबत १० च्या वर याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. एनटीएच्या अहवालानंतर या याचिका रद्द करण्यात आल्या.

न्यायालयाने एनटीएला मृण्मयीच्या १२ मे रोजीच्या तक्रारीवर चौकशी करून नीटचा निकाल घोषित होण्यापूर्वी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. याचिकेवर आता १६ जून रोजी सुनावणी होणार आहे. याचिकाकर्त्यांकडून अॅड. आनंद ठाकरे व अॅड. मंदार देशपांडे यांनी बाजू मांडली.

टॅग्स :neet exam paper leakनीट परीक्षा पेपर लीकNEET EXAM Resultनीट परीक्षेचा निकालnagpurनागपूरHigh Courtउच्च न्यायालय