शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

आजारी समाजाला सुधारण्यासाठी लाखो उल्कांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 1:04 AM

संघर्ष माणसाला जीवन जगायला, माणूस वाचायला आणि स्वत:मधील ऊर्जेचा शोध घ्यायला शिकवतो. या संघर्षाकडे डोळेझाक करणाऱ्यांचे आयुष्य सपक आणि अर्थहीन ठरते. उल्का महाजन यांचे जगणे अशाच प्रेरणादायी संघर्षाने भरले आहे. त्यांचा लढा आर्थिक, सामाजिक व राष्ट्रीय अंगाने महत्त्वाचा आहे. आज समाज विशिष्ट मानसिक आजाराने ग्रस्त होत आहे. या समाजाचा आजार दूर करण्यासाठी लाखो उल्कांची गरज आहे, असे मनोगत ज्येष्ठ कवी, विचारवंत डॉ. यशवंत मनोहर यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देयशवंत मनोहर : उल्का महाजन यांना ताराबाई शिंदे समाजकार्य पुरस्कार प्रदान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संघर्ष माणसाला जीवन जगायला, माणूस वाचायला आणि स्वत:मधील ऊर्जेचा शोध घ्यायला शिकवतो. या संघर्षाकडे डोळेझाक करणाऱ्यांचे आयुष्य सपक आणि अर्थहीन ठरते. उल्का महाजन यांचे जगणे अशाच प्रेरणादायी संघर्षाने भरले आहे. त्यांचा लढा आर्थिक, सामाजिक व राष्ट्रीय अंगाने महत्त्वाचा आहे. आज समाज विशिष्ट मानसिक आजाराने ग्रस्त होत आहे. या समाजाचा आजार दूर करण्यासाठी लाखो उल्कांची गरज आहे, असे मनोगत ज्येष्ठ कवी, विचारवंत डॉ. यशवंत मनोहर यांनी व्यक्त केले.आकांक्षा प्रकाशनतर्फे दिला जाणारा पहिला ताराबाई शिंदे सामाजिक कार्य पुरस्कार मंगळवारी सामाजिक कार्यकर्त्या व ‘कोसळता गावगाडा’ या ऐतिहासिक पुस्तकाच्या लेखिका उल्का महाजन यांना प्रदान करण्यात आला. याप्रसंगी डॉ. रुपाताई कुळकर्णी-बोधी, विलास भोंगाडे आदी मान्यवर उपस्थित होते. पुरस्काराला उत्तर देताना उल्का महाजन यांनी गावापासून सुरू झालेला संघर्ष आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचण्याचा रोमांचक उलगडा केला. वैयक्तिक आयुष्यात प्रचंड हाल सहन करून या लढ्यात सहभागी होत खंबीरपणे सोबत असलेल्या कार्यकर्त्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करीत त्यांनी संघर्षाची गाथा मांडली. रायगड जिल्ह्यात दलित अत्याचाराविरोधापासून लढ्याला सुरुवात झाली. पुढे या भागातील कातकरी आदिवासींच्या समस्या घेऊन वेठबिगारी, अत्याचार, वर्तमान काळातही गावात पाळला जाणारा जातीभेदाच्या समस्यांसह वन हक्कांचे प्रश्नांसाठी लढा वाढत गेला. हा संघर्ष जातीयवाद आणि सरंजामशाहीच्या राहिलेल्या अवशेषांविरोधातील होता, जे आपल्यासमोर आहेत. मात्र यापुढे समोर न दिसणाºया भांडवलदारांविरोधात लढा सुरू झाला. धनदांडगे, मोठमोठ्या कंपन्यांचे भांडवलदार गावगाड्यातील आदिवासी, शेतकरी यांच्या जमिनी पैशांच्या जोरावर बळकावू पाहत आहेत. त्यांच्याविरोधात सामान्य माणसांना घेऊन लढलेला लढा यशस्वी झाला. हाही संघर्ष देशातील धनदांडग्यांच्या विरोधातील होता. मात्र यापुढचा लढा या देशातील जमिनी बळकावू पाहणाºया आंतरराष्टÑीय कंपन्याविरोधात असल्याचे त्यांनी सांगितले. समृद्धी मार्ग, रेल्वे कॉरिडॉर, सागरीमाला, भारतमाला या मनोहारी नावाने हे षड्यंत्र चालले आहे. गावातील सरंजामांची ताकत स्थानिक व्यवस्था व नेत्यांशी जुळली असते. हा लढा कठीण आहे, कारण या न दिसणाºया भांडवलदारांनी स्थानिक संस्था, पोलीस व्यवस्था, न्यायव्यवस्था, माध्यमे यांनाही गुलाम बनविले असल्याचे वास्तव महाजन यांनी अनेक अनुभवातून मांडले. त्यांच्याच तालावर नाचणारे सरकार सामान्य माणसांच्या हक्काचा आवाज असलेले संविधान व लोकशाही उद्ध्वस्त करण्याची तयारी करीत आहे.विकासाच्या नावाखाली देशाचा ४० टक्के भूभाग परकीय सत्तांच्या हातात जाणार आहे. हिटलरशाही व फॅसिजम आणू पाहणारे सरकार मदतीला येणार नाही, त्यामुळे या संघर्षात मदतीसाठी समाजाने तातडीने जागे होण्याची गरज असल्याचे मनोगत त्यांनी व्यक्त केले.डॉ. रुपाताई कुळकर्णी-बोधी यांनी अध्यक्षीय विचार मांडले. प्रास्ताविक आकांक्षा प्रकाशनच्या अरुणा सबाने यांनी व संचालन रेखा दंडिगे-घिया यांनी केले. प्रा. रेखा ठाकरे यांनी आभार मानले.

टॅग्स :nagpurनागपूर