शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्नांची गरज

By admin | Updated: February 15, 2015 02:30 IST

विज्ञान क्षेत्रात दैनंदिन होणारे बदल भारतीय शिक्षण पद्धतीशी जोडून ग्रामीण भागात शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

नागपूर : विज्ञान क्षेत्रात दैनंदिन होणारे बदल भारतीय शिक्षण पद्धतीशी जोडून ग्रामीण भागात शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.त्रिमूर्तिनगरतील भारतीय विद्या भवन्सच्या भगवानदास पुरोहित विद्या मंदिरच्या चौथ्या शाळेच्या इमारतीचे उद््घाटन शुक्रवारी फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भारतीय विद्या भवन्स नागपूर केंद्राचे अध्यक्ष व माजी खासदार बनवारीलाल पुरोहित होते. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार अजय संचेती, महापौर प्रवीण दटके, आमदार सर्वश्री कृष्णा खोपडे, आशिष देशमुख, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती श्याम वर्धने, डॉ. सुनंदा सोनारीकर, राजेंद्र पुरोहित, राकेश पुरोहित उपस्थित होते.ग्रामीण भागात शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी शासनाकडून प्रयत्न सुरू असून, या क्षेत्रात शिक्षक आणि शिक्षण संस्थांचाही सहभाग मोलाचा ठरतो, असे फडणवीस म्हणाले. शिक्षण क्षेत्रातील भारतीय विद्या भवन्सची कामगिरी मोलाची असल्याचे ते म्हणाले.चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, कोराडी-खापरखेडा या भागातून मोठ्या प्रमाणात मुले शिक्षणासाठी नागपुरात येतात. त्यांच्यासाठी कोराडी कॉलनीतील दहा एकर जागेत भवन्सने शाळा सुरू करावी. बनवारीलाल पुरोहित यांनी संस्थेबाबत माहिती दिली. प्राचीन आणि आधुनिक संस्कृतीची सांगड घालून युवापिढीला गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे हा या संस्थेचा मुख्य उद्देश असून, शिक्षणाचा दर्जा उंचावण्याचे काम संस्थेतर्फे केले जात आहे, असे बनवारीलाल पुरोहित म्हणाले.सुरुवातीला फडणवीस यांच्या हस्ते नव्या इमारतीच्या कोनशिलेचे अनावरण झाले. यावेळी त्यांच्या हस्ते मोहन सालोडकर, प्रखर गुप्ता आणि कौस्तुभ व्यास या गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि इमारत उभारणीत योगदान देणारे अविनाश डोंगरे, दिलीप म्हसे, विनयकुमार जैन व रेणुका मोहरील यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन संगीता बत्रा यांनी केले.प्रो. क्यू.एच. जीवाजी यांनी आभार मानले. कार्यक्रमाला व्ही.व्ही. भास्करन, डॉ. रूपा कुळकर्णी यांच्यासह शहरातील गणमान्य नागरिक उपस्थित होते.(प्रतिनिधी)