शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
2
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
3
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
4
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
5
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
6
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
9
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
10
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
11
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
12
अधिक मास शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींना वरदान काळ, चौफेर चौपट लाभ; भरघोस भरभराट, शुभ घडेल!
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
19
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
20
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
Daily Top 2Weekly Top 5

कारागृह परिसराला जामर लावण्याची गरज

By admin | Updated: June 16, 2014 01:02 IST

कडेकोट सुरक्षाव्यवस्था भेदून नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात सर्रासपणे मोबाईल पोहोचत आहेत. बंदिस्त कच्चे कैदी मोबाईलचा वापर करून खंडणी वसूल करीत आहेत. व्यापारी आणि अन्य व्यवसायिकांमध्ये

खंडणी वसुलीसाठी सर्रास होतोय मोबाईलचा वापर
नागपूर : कडेकोट सुरक्षाव्यवस्था भेदून नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात सर्रासपणे मोबाईल पोहोचत आहेत. बंदिस्त कच्चे कैदी मोबाईलचा वापर करून खंडणी वसूल करीत आहेत. व्यापारी आणि अन्य व्यवसायिकांमध्ये दहशत पसरवीत आहेत. कारागृह सुरक्षा व्यवस्थेचे हे अपयशच आहे. यावर मात म्हणून कारागृहातील मोबाईल सेवाच निष्क्रिय करण्याची गरज आहे. त्यासाठी परिसरात जामर यंत्रणा उभारण्यात यावी किंवा नजीकचे संपूर्ण मोबाईल टॉवर सील करावे, असे जाणकार सूत्रांचे म्हणणे आहे.
आपल्या गुन्हेगारी कृत्याने समाजात दहशत निर्माण करणाऱ्या व्यक्तींच्या गुन्हेगारी प्रवृत्तीत सुधारणा व्हावी, समाज व्यवस्था सुरक्षित व निर्भय राहावी, या मुख्य हेतूतून कारागृहांची निर्मिती झाली. परंतु हल्ली कारागृह हे समाजात दहशत पसरविणाऱ्या गुन्हेगारांसाठी अड्डे झाले आहेत. खंडणी वसुली आणि ‘सुपारी किलिंग’ चे गुन्हे कारागृहाच्या उंच भिंतीच्या आडून घडत असेल तर कारागृह निर्मितीमागील मूळ हेतूच संपुष्टात येतो. उंच भिंतीआडून अनेक गुन्हे घडतात परंतु काहीच चव्हाट्यावर येतात. अनेक जण भीतीपोटी तक्रार करण्याचे धाडसच करीत नाहीत.
कारागृहातून खंडणी वसूल करण्याचा नुकताच एक प्रकार उजेडात आला. अजनी भागात राहणारा कुख्यात गुन्हेगार अमर लोहकरे हा महाराष्ट्र संघटित गुन्हे नियंत्रण कायद्यांतर्गत मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त आहे. सध्या तो कच्चा कैदी आहे. त्याने २५ मे २०१४ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास बजरंगनगर येथील हार्डवेअर व्यवसायी शेषराव आष्टनकर यांना कारागृहातून बाहेर येण्यासाठी दोन लाखांच्या खंडणीची मागणी केली. या व्यावसायिकाने हिम्मत करून अजनी पोलीस ठाण्यात या गुंडाविरुद्ध तक्रार केली आणि कारागृहात चालणारे कारस्थान उजेडात आले.
चालू वर्षाच्या प्रारंभीच कारागृह अधिकाऱ्याने आपल्या पथकासह कारागृहात धाडी घालून मोंटी भुल्लर खुनातील आरोपी दिवाकर कोथुलवार, आशिष कोथुलवार, मंगेश शेंडे, सेव्हन हिल्स बार खुनातील आरोपी तुषार दलाल, लच्छू फाये आणि अन्य एक कुख्यात गुन्हेगार संजय अवतारे यांच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणावर मोबाईल, रोख रक्कम आणि मादक पदार्थ जप्त करण्याची कारवाई केली. हे मोबाईल नेमके कोणाचे होते, ते कारागृहात कसे काय आले, मोबाईलचा कोणत्या कामासाठी वापर झाला आदी अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. धाडीच्या या प्रकरणावरच पुढे पांघरूण घालण्यात आले.
कारागृहात दाखल होणाऱ्या आरोपींची वेगवेगळ्या टप्प्यात कसून अंगझडती घेतली जाते. तरीही मोबाईल आणि आक्षेपार्ह वस्तू कशा काय आत झिरपतात, असा प्रश्न आहे.
आजही अनेक मोबाईल कारागृहात असून त्यांचा वापर खंडणी वसुली आणि साक्षीदारांना फितूर करण्यासाठी केला जात आहे. त्यामुळे विशिष्ट गुन्हेगारांची बाहेरही दहशत आणि बंदिस्त असूनही दहशत, अशी स्थिती आहे. कारागृहातून सुरू झालेली ही नव्या स्वरूपाची गुन्हेगारी रोखणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा तिला भविष्यात आणखी भयावह स्वरूप प्राप्त होऊ शकते. कारागृह सुरक्षाही धोक्यात येऊ शकते. कारागृह प्रशासनाने संपर्कासाठी केवळ ‘लँड लाईन’चाच वापर केला पाहिजे. कारागृह परिसरात संपूर्ण जामर यंत्रणा बसविली जावी किंवा या परिसरातील संपूर्ण मोबाईल टॉवर सील केले जावे, असेही या सूत्रांचे म्हणणे आहे.