डुकरे पकडण्यासाठी यापुढे एनडीएस करणार मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 12:33 AM2019-07-25T00:33:07+5:302019-07-25T00:34:11+5:30

शहरातील डुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी, त्यांना पकडण्यासाठी आलेल्या तामिळनाडूतील पथकावर मंगळवारी जरीपटक्यातील बँक कॉलनीमध्ये हल्ला झाला. यात सहा सदस्य जखमी झाले होते. ही घटना मनपाचे प्रभारी आयुक्त रवींद्र ठाकरे आणि अपर आयुक्त राम जोशी यांनी गंभीरपणे घेतली आहे. त्यांनी बुधवारला एक बैठक घेऊन शहरातील कचरा, अतिक्रमणावर लक्ष ठेवणाऱ्या न्यूसेन्स डिटेक्शन स्क्वॉड(एनडीएस)मधील सदस्यांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे.

NDS help to catch pigs | डुकरे पकडण्यासाठी यापुढे एनडीएस करणार मदत

डुकरे पकडण्यासाठी यापुढे एनडीएस करणार मदत

googlenewsNext
ठळक मुद्देसैन्यातील निवृत्त जवान झाले स्वच्छतादूत : पथकाला सुरक्षा प्रदान करणार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील डुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी, त्यांना पकडण्यासाठी आलेल्या तामिळनाडूतील पथकावर मंगळवारी जरीपटक्यातील बँक कॉलनीमध्ये हल्ला झाला. यात सहा सदस्य जखमी झाले होते. ही घटना मनपाचे प्रभारी आयुक्त रवींद्र ठाकरे आणि अपर आयुक्त राम जोशी यांनी गंभीरपणे घेतली आहे. त्यांनी बुधवारला एक बैठक घेऊन शहरातील कचरा, अतिक्रमणावर लक्ष ठेवणाऱ्या न्यूसेन्स डिटेक्शन स्क्वॉड(एनडीएस)मधील सदस्यांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे.
एनडीएसअंतर्गत कार्यरत असलेले सर्व स्वच्छतादूत सैन्यातील निवृत्त जवान असून, सैन्यामध्ये विविध पदांवर कार्य केलेले आहेत. अनेक जवानांना युद्धाचा आणि दंगलींवर नियंत्रण मिळविण्याचा अनुभवही आहे. हे लक्षात घेऊन रवींद्र ठाकरे यांनी पोलिसांसोबतच एनडीएस टीमची या मोहिमेच्या काळात मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. तामिळनाडूतील पथकाला ते सुरक्षा प्रदान करतील.
एनडीएसचे प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात बुधवारी स्वच्छतादूतांची स्वतंत्र बैठक झाली. यात स्वच्छतादूतांना त्यांच्या जबाबदारीसंदर्भात जाणीव करून देण्यात आली. मोहिमेच्या काळात कुणी असामाजिक तत्त्व हल्ला करीत असतील तर त्यांच्यावर सैन्य कौशल्याचा उपयोग करून हा हल्ला परतवून लावण्याचे आदेशही देण्यात आले. मनपा प्रशासन आणि पोलिसांनी त्यांना सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.
प्राप्त माहितीनुसार, ४६ स्वच्छतादूत तामिळनाडूच्या पथकासोबत दिवस-रात्र राहतील. रोज १०० डुकरे पकडण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. बेवारस डुकरांचा शहरात मोठ्या प्रमाणावर संचार वाढल्याने, हे पाऊल उचलण्यात आले आहे.
महापौर कक्षापुढे वराहपालकांची गर्दी
शहरात सुरू असलेल्या डुकरे पकडण्याच्या मोहिमेविरोधात बुधवारी वराहपालक मनपाच्या मुख्यालय पोहचले. त्यांनी महापौर नंदा जिचकार यांची भेट घेऊन आपली समस्या सांगितली. ही कारवाई तातडीने बंद करण्याची मागणी त्यांनी केली. याचदरम्यान उत्तर नागपुरातील भाजपाची काही नेतेमंडळीही ही कारवाई थांबविण्याच्या बाजूने दिसली. मात्र प्रशासनापासून तर पदाधिकाऱ्यांपर्यंत सर्वांचेच या मोहिमेला समर्थन असून, डुकरे पकडून शहराबाहेर सोडण्यावर ही मंडळी ठाम आहे.

Web Title: NDS help to catch pigs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.