शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

आघाडीबाबत राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट नाही : शरद पवार काय बोलतात त्याचे दोन-तीन अर्थ होतात

By कमलेश वानखेडे | Updated: June 14, 2025 16:39 IST

Nagpur : महाराष्ट्र हे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा हब

कमलेश वानखेडेलोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : स्थानिक स्वराज्य संस्थाा निवडणुकीत महाविकास आघाडी होईल की नाही, याबाबत आता काँग्रेस नेते शंका व्यक्त करू लागले आहेत. शरद पवार काय बोलतात त्याचे दोन-तीन अर्थ होतात. जोपर्यंत स्पष्ट होत नाही, तोपर्यंत काही बोलता येत नाही. राष्ट्रवादीच्या भूमिकेत जोपर्यंत स्पष्टता येत नाही तोपर्यंत बोलणं उचित नाही, असे मत काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले. आघाडीबाबत स्थानिक स्तरावर नेत्यांनी जो निर्णय घ्यायचा आहे, तो त्यांनी घ्यावा असे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे स्थानिक नेत्यांना ‘एकला चलो’साठी मुभाही दिली.

शनिवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, महायुतीचे चित्रही स्पष्ट नाही. एकनाथ शिंदे आहेत, अजित पवार हे महायुतीत आहेत. ते आता आघाडी करतील का, हे आता बोलता येत नाही. त्यामुळे कुणी चुकीचा अर्थ काढू नये, थोडा धीर धरावा.

महाराष्ट्र हे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा हबबच्चू कडूंच्या आंदोलनाला महाविकास आघाडी म्हणून रोहित पवार स्वतः भेट द्यायला गेले होते. शरद पवार यांनीबी फोन केला होता आणि यापूर्वीच काँग्रेसने भूमिका स्पष्ट केली आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत. शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन लढेल त्यांना आमचा पाठिंबा असेल, म्हणून बच्चू कडूंच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे. महाराष्ट्र हे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा हब झालेल आहे. सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत. गेल्या दोन वर्षात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी संकटात आले, त्यांना कुठलीही मदत सरकारने केली नाही, अशी टीका त्यांनी केली.

भाजपमध्ये दोन गटमहाराष्ट्र असो, देश असो की मुंबई भाजप प्रत्येक ठिकाणी दोन गट आहेत. ते बंद खोलीत एकमेकांना ठोसा ठासी करतात. आमच्याकडे जास्त लोकशाही आहे, आम्ही उघडपणे करतो. काँग्रेससह इतर पक्षातून घेतलेल्या लोकांना खिरापत दिली जात आहे. त्यामुळे जुन्या लोकांना वेदना आणि दुःख होत आहे, याचा हा परिणाम आहे, असा टोला वडेट्टीवार यांनी लगावला.

टॅग्स :nagpurनागपूरVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारBachhu Kaduबच्चू कडूSharad Pawarशरद पवार