राष्ट्रवादी मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडणार नाही

By Admin | Updated: July 28, 2014 01:24 IST2014-07-28T01:24:29+5:302014-07-28T01:24:29+5:30

मंत्रिपदे सोडा, आघाडीत संपूर्ण मंत्रिमंडळ वाट्याला आले तरी मुख्यमंत्रिपदावरील दावा राष्ट्रवादी सोडणार नाही, अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी रविवारी

NCP will not leave the claim on the chief minister's post | राष्ट्रवादी मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडणार नाही

राष्ट्रवादी मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडणार नाही

सुनील तटकरे : स्वतंत्र विदर्भाच्या मागणीचा विचार
वर्धा : मंत्रिपदे सोडा, आघाडीत संपूर्ण मंत्रिमंडळ वाट्याला आले तरी मुख्यमंत्रिपदावरील दावा राष्ट्रवादी सोडणार नाही, अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी रविवारी वर्ध्यात मांडली.
राष्ट्रवादी १४४ जागांच्या भूमिकेवर ठाम आहे. तशी अटीतटीची वेळ आल्यास पक्षाचे नेते शरद पवार आणि काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या पातळीवर हा मुद्दा निकालात काढला जाईल, असे सूतोवाच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी केले. राष्ट्रवादीच्या निर्धार मेळाव्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.विद्यमान अपक्ष आमदार राष्ट्रवादी वा काँग्रेसच्या संपर्कात असेल तर त्यांना त्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढता यावी, यावर विचारमंथन सुरू आहे. या अनुषंगाने वर्धा विधानसभा राष्ट्रवादी मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडणार नाही़ मतदारसंघावर राष्ट्रवादी दावा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
जनतेचा पाठिंबा असेल तरच वेगळा विदर्भ
विदर्भासाठी यापूर्वीही अनेकदा आंदोलने झालीत. केवळ राजकीय पुढारी ही आंदोलने करीत आली आहेत. त्यांना जनतेचा पाठिंबा दिसत नाही. जनतेकडून प्रतिसादाच्या रूपाने ही मागणी पुढे आल्यास पक्ष या मागणीचा नक्कीच विचार करेल, अशी भूमिका राष्ट्रवादीने घेतली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: NCP will not leave the claim on the chief minister's post