शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

जयंत पाटलांचा फडणवीसांवर निशाणा, अजित पवार मदतीला धावले; नेहमीच्या शैलीत फटकारलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2023 15:41 IST

जयंत पाटील यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनाचा कालावधी आणखी वाढवायला हवा होता, असा मुद्दा उपस्थित करत फडणवीसांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला.

Ajit Pawar Vs Jayant Patil ( Marathi News ) : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस आहे. विरोधी पक्षाच्या वतीने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि आमदार नाना पटोले यांनी आज सभागृहात अंतिम आठवडा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला उत्तर देण्यासाठी भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उभे राहिले होते. मात्र यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी अधिवेशन कालावधी आणखी वाढवायला हवा होता, असा मुद्दा उपस्थित करत फडणवीसांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार हे तडकाफडकी उठले आणि त्यांनी आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीत जयंत पाटील यांना फटकारलं.  इथे वेगळं बोलायचं आणि बाहेर वेगळं बोलायचं हे धंदे बंद करा, असं अजित पवार हे जयंत पाटलांना उद्देशनू म्हणाले.

विदर्भात अधिवेशन होत असताना विरोधी पक्षाने विदर्भाचा विषय मांडला नसल्याचा आम्हाला खेद वाटतो, असा हल्लाबोल देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. फडणवीसांच्या या टीकेला उत्तर देताना जयंत पाटील यांनी अधिवेशन कालावधीचा मुद्दा उपस्थित करत म्हटलं की, "विदर्भाचा विषय सत्ताधारी पक्षाने मांडल्यामुळे आम्ही मांडला नाही. 'ऑर्डर ऑफ द डे'मध्ये आजही तो विषय आहे आणि त्यावर चर्चा होणार आहे म्हणून आम्ही सगळेजण बसून आहोत. मात्र दहा दिवस अधिवेशन घ्यायचं आणि तिकडून दोन प्रस्ताव व या बाजूने एक प्रस्ताव किंवा इथून दोन प्रस्ताव आणि तिकडून एक प्रस्ताव असं तुम्ही करत आहात. त्यापेक्षा अधिवेशन एक महिन्याचं घ्यावं, अशी आमची मागणी होती," असं पाटील म्हणाले.

अधिवेशन कालावधीवरून जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांची कोंडी करण्याचा प्रयत्न करताच उत्तर देण्यासाठी अजित पवार उठू लागले. त्यावर जयंत पाटील यांनी आधी कोणी बोलायचं हे बसून ठरवा, असं म्हटलं. त्यानंतर आक्रमक झालेले अजित पवार जयंत पाटलांना फटकारत म्हणाले की, " बसून ठरवण्याची गरज नाही. आमचं अण्डरस्टँडिंग खूप चांगलं आहे. कधी कोणी बोलायचं हे कळतं आम्हाला. अंतिम आठवडा प्रस्ताव काल आला. तेव्हा विरोधी पक्षाला कळालं होतं की अधिवेशन उद्या संपणार आहे. त्यावेळीच त्यांनी विधानसभा अध्यक्षांना सांगायला पाहिजे होतं की आम्हाला अंतिम आठवडा प्रस्ताव द्यायचा नाही. इथे वेगळं बोलायचं आणि बाहेर वेगळं बोलायचं हे धंदे बंद करा," अशा शब्दांत अजित पवारांनी पाटलांना खडसावलं.

दरम्यान, राष्ट्रवादीतील फुटीनंतर जाहीर सभांमधून दोन्ही गटाचे नेते अनेकदा एकमेकांवर निशाणा साधताना पाहायला मिळत होते. या नेत्यांमधील संघर्ष आता थेट सभागृहातही पोहोचल्याचं आज अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यामध्ये झालेल्या खडाजंगीतून दिसून आलं. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसJayant Patilजयंत पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस