इंधन दरवाढीच्या विरोधात नागपुरात राष्ट्रवादीचा भडका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 10:57 IST2018-02-16T10:55:34+5:302018-02-16T10:57:12+5:30
पेट्रोल-डिझेल व गॅसच्या वाढत्या किमतीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरली. संविधान चौकात निदर्शने करीत चूल पेटवून निषेध करण्यात आला.

इंधन दरवाढीच्या विरोधात नागपुरात राष्ट्रवादीचा भडका
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पेट्रोल-डिझेल व गॅसच्या वाढत्या किमतीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरली. संविधान चौकात निदर्शने करीत चूल पेटवून निषेध करण्यात आला. महागाई वाढवून मोदी सरकार अच्छे दिन कसे आणणार, असा सवालही यावेळी कार्यकर्त्यांनी केला.
शहर अध्यक्ष अनिल अहीर अहीरकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात माजी आ. दीनानाथ पडोळे, माजी शहर अध्यक्ष दिलीप पनकुले, प्रवीण कुंटे पाटील यांच्यासह पदाधिकाºयांनी मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सरकारने पुढाकार घेऊन पेट्रोल, डिझेल व गॅसचे दर कमी करावे, अशी मागणी करीत जनतेच्या हितासाठी राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरेल, असा इशारा अहीरकर यांनी यावेळी दिला.