गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी जाळले चार टिप्पर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 11:54 IST2020-05-20T11:53:27+5:302020-05-20T11:54:47+5:30

छत्तीसगडमधील राजनांदगाव ते धानोरा (जि.गडचिरोली) मार्गावर सावरगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत गजामेंढी गावाजवळ नक्षलवाद्यांनी 4 टिप्परची जाळपोळ केली. मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना झाल्याची माहिती आहे. सदर टिप्पर छत्तीसगडमधून रेती घेऊन येत होते.

Naxals set fire to four tippers in Gadchiroli | गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी जाळले चार टिप्पर

गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी जाळले चार टिप्पर

ठळक मुद्देबंद पाळण्याचे केले होते आवाहनछत्तीसगडमधून आणत होते बांधकामासाठी रेती


लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : छत्तीसगडमधील राजनांदगाव ते धानोरा (जि.गडचिरोली) मार्गावर सावरगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत गजामेंढी गावाजवळ नक्षलवाद्यांनी 4 टिप्परची जाळपोळ केली. मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना झाल्याची माहिती आहे. सदर टिप्पर छत्तीसगडमधून रेती घेऊन येत होते.
गेल्या 2 मे रोजी पोलिसांशी झालेल्या चकमकीत जहाल नक्षली सृजनक्का ठार झाली होती. त्याचा निषेध म्हणून नक्षलवाद्यांनी बुधवारी बंद पाळण्याचे आवाहन केले होते. दरम्यान सदर वाहने जाळली त्या परिसरात अँम्बुश लावला असण्याच्या शक्यतेमुळे सकाळी बराच वेळपर्यंत घटनास्थळी कोणीही गेले नव्हते.

Web Title: Naxals set fire to four tippers in Gadchiroli