शहरं
Join us  
Trending Stories
1
Philippines Protest 2025: फिलिपिन्समध्ये लोक रस्त्यावर; भ्रष्टाचाराविरोधात देशभरात आंदोलन पेटले
2
Local Body Elections: नगरांच्या निवडणुकांमध्ये 'दुसरा' टप्पा, काही ठिकाणी २० डिसेंबरला मतदान
3
अग्रलेख : शेवटी मरण कार्यकर्त्यांचेच! अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार?
4
फोनमध्ये सिम नसल्यास अॅप्स वापरता येणार नाहीत; दर सहा तासांनी व्हॉट्सअॅप वेब थेट लॉगआउट होणार!
5
नगर परिषद, नगर पंचायत निवडणूक २०२५:  रात्री दहापर्यंत पडणार आश्वासनांचा 'पाऊस'!
6
विशेष लेख: इम्रान खान जिवंत आहेत की नाहीत?
7
Vande Bharat Depot: पुण्यासह राज्यात तीन ठिकाणी वंदे भारत 'कोचिंग डेपो' वाढविणार
8
मध्य रेल्वेवर लवकरच २० प्लॅटफॉर्म वाढणार, कोकणसाठी अतिरिक्त मेल, एक्स्प्रेस चालवणे शक्य
9
IND vs SA 1st ODI : टॉस गमावला, पण मॅच जिंकली! कसोटीतील बिघाडीनंतर टीम इंडियाची वनडे मालिकेत आघाडी
10
हाताला सलाइन, नाकाला ऑक्सिजन पाइप; छगन भुजबळांचा रुग्णालयातून प्रचार, भावनिक होत म्हणाले...
11
“कितीही करा कल्ला, मालवण शिवसेनेचाच बालेकिल्ला”: एकनाथ शिंदे; निलेश राणेंचेही केले कौतुक
12
“मुंबईत ठाकरेंचे काही चालणार नाही, उद्धव यांनी राज यांना सोबत घेऊन चूक केली”; कुणाचा दावा?
13
“नवरा १००₹ देत नव्हता, पण देवाभाऊ लाडक्या बहिणींना १५०० देतात”; भाजपा नेत्यांचे विधान चर्चेत
14
SIR तपासात गडबड उघड! गोव्यात ९० हजार मतदारांवरील मोठी विसंगती आली समोर; अधिकारी म्हणाले...
15
०१ डिसेंबरला रेल्वे नियम बदलणार! तत्काळ तिकिटासाठी लागणार OTP; मुंबईतील ‘या’ ट्रेनपासून सुरू
16
“जिकडे बॉम्बे असेल तिकडे मुंबई करू, शाळेची नावेही बदलू”; उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला निर्धार
17
IND vs SA 1st ODI : कुलदीपनं ३ चेंडूत फिरवली मॅच! एकाच ओव्हरमध्ये २ विकेट्स अन्...
18
VIDEO : "समझने वालों को इशारा काफी!" विराटला गंभीरची मिठी; पण रोहितची रिअ‍ॅक्शनच ठरली 'शोस्टॉपर'
19
दिल्लीतील पराभवानंतर अवध ओझा सरांचा राजकारणाला रामराम; AAP मधून बाहेर पडले...
20
VIDEO : "उपकार विसरू नका! नाहीतर…" बेताल वक्तव्य करणाऱ्या SA कोचला गावसकरांनी दिली ताकीद
Daily Top 2Weekly Top 5

नक्षलवाद्यांचे अस्तित्व १२६ जिल्ह्यांवरून उरले केवळ १८ जिल्ह्यांपुरता ! आत्मसमर्पणाचाच एकमेव पर्याय

By योगेश पांडे | Updated: October 15, 2025 12:55 IST

Nagpur : सुरक्षा यंत्रणांचा नक्षल चळवळीवर वार; आत्मसमर्पणाचाच उरला पर्याय

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : माओवाद्यांचा पॉलिट ब्युरो मेंबर तसेच सेंट्रल कमिटी मेंबर मल्लोजूला वेणुगोपाल राव ऊर्फ सोनू ऊर्फ भूपती याने त्याच्या ६० सहकाऱ्यांसह गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले व नक्षलवादी चळवळीला हा मोठा धक्का मानण्यात येत आहे. मागील काही वर्षांमध्ये सुरक्षा यंत्रणांनी नक्षल चळवळीवर नियोजनबद्ध पद्धतीने वार करत कंबरडे मोडले आहे. अनेकांचा एन्काउंटर झाला असून, नाइलाजाने मुख्य प्रवाहात येण्याची संधी मिळावी यासाठी नक्षलवादी आत्मसमर्पण करत आहेत. देशभरात या वर्षभरात आत्मसमर्पणाचा आकडा चौदाशेहून अधिक गेला आहे.

मागील दहा वर्षात सुरक्षादलांनी विविध माध्यमांतून नक्षलवादी संघटनांची कोंडी केली आहे. त्यामुळेच त्यांचा प्रभाव असलेल्या क्षेत्रात घट होत आहे. १० वर्षांतच नक्षलवाद्यांचे अस्तित्व १२६ वरून केवळ १८ जिल्ह्यांपुरते मर्यादित राहिले आहे. या संघटनांवरदेखील जोरदार प्रहार करण्याची तयारी सुरू आहे. २०२४ मध्ये देशभरात २९० नक्षलवाद्यांना विविध चकमकींमध्ये ठार मारण्यात आले होते, तर १ हजार ९० नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली होती. या धास्तीतून ८८१ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पणाचा मार्ग स्वीकारला होता. २०२३ मध्ये ३८० नक्षलवाद्यांचे एन्काउंटर झाले होते. १ हजार १९४ जणांना अटक झाली होती व १ हजार ४५ नक्षलवादी शरण आले होते. यंदा हा रेकॉर्ड मोडला गेला आहे. १० महिन्यातच चौदाशेहून अधिक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. 

देशातील १८ जिल्ह्यांतच उरले अस्तित्व

नक्षलवाद्यांवर सातत्याने होत असलेल्या प्रहारामुळे अनेक बदल होत आहेत. २०१३ साली देशात १२६ जिल्ह्यांत नक्षलवाद्यांचा प्रभाव किंवा सक्रियता होती. मात्र आता हे अस्तित्व केवळ १८ जिल्ह्यांपुरतेच मर्यादित राहिले आहे.

नक्षलवाद्यांच्या फंडिंगवर प्रहार

नक्षलवाद्यांचा बीमोड करण्यासाठी २०१५ साली राष्ट्रीय धोरण व कृती आराखडा निर्धारित करण्यात आला होता. सातत्याने नक्षलवाद्यांकडून हिंसाचार सुरू होता. सुरक्षा यंत्रणांनी सर्वांत अगोदर नक्षलवाद्यांच्या फंडिंगच्या मार्गावर प्रहार सुरू केला. यामुळे जंगलांमध्ये राहून चळवळीत काम करणे अनेकांसाठी अशक्य होऊ लागले. फंडिंगवर आलेला अंकुश आणि दुसरीकडे सुरक्षा यंत्रणांना मिळालेला 'फ्री हॅण्ड' यामुळे कधीही एन्काउंटर होण्याची भीती असते. त्यातूनच भूपती व त्याच्या सहकाऱ्यांनी आत्मसमर्पणाचे पाऊल उचलल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Naxalite Presence Shrinks: Surrenders Surge, Confined to 18 Districts

Web Summary : Naxalite influence wanes, now limited to 18 districts from 126. Increased security pressure and funding cuts drive surrenders. Over 1400 Naxalites surrendered this year, signaling a significant blow to the movement.
टॅग्स :naxaliteनक्षलवादीGadchiroliगडचिरोली