शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नक्षलवादी पहाडसिंगचे छत्तीसगड पोलिसांसमोर आत्मसमर्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 23:50 IST

महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यांच्या पोलिसांसाठी डोकेदुखी ठरलेला आणि कोटी रुपयांचे बक्षीस असलेला नक्षली नेता पहाडसिंगने अखेर छत्तीसगड पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. या तिन्ही राज्यांच्या पोलिसांनी त्याच्यावर एक कोटी रुपयांचे बक्षीस ठेवले होते. पहाडसिंग याच्या आत्मसमर्पणाला महाराष्ट्राच्या नवजीवन योजनेचा परिणाम म्हणून पाहिले जात आहे. कारण त्याच आधारे त्याचे मन परिवर्तन करण्याचा प्रयत्न वर्ष-२०१२ पासून करण्यात येत होता. त्याच्या आत्मसमर्पणात त्याच्या दोन्ही मुलींची भूमिका महत्त्वाची समजली जात आहे.

ठळक मुद्देमहाराष्ट्रच्या ‘नवजीवन’ योजनेला यश : त्याच्या मुलींचे विशेष प्रयत्न

फहीम खानलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यांच्या पोलिसांसाठी डोकेदुखी ठरलेला आणि कोटी रुपयांचे बक्षीस असलेला नक्षली नेता पहाडसिंगने अखेर छत्तीसगड पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे.या तिन्ही राज्यांच्या पोलिसांनी त्याच्यावर एक कोटी रुपयांचे बक्षीस ठेवले होते. पहाडसिंग याच्या आत्मसमर्पणाला महाराष्ट्राच्या नवजीवन योजनेचा परिणाम म्हणून पाहिले जात आहे. कारण त्याच आधारे त्याचे मन परिवर्तन करण्याचा प्रयत्न वर्ष-२०१२ पासून करण्यात येत होता. त्याच्या आत्मसमर्पणात त्याच्या दोन्ही मुलींची भूमिका महत्त्वाची समजली जात आहे.नक्षलविरोधी मोहिमेंतर्गत छत्तीसगड पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. पहाडसिंगने भिलई पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. दुर्गचे आयजी जी.पी. सिंह यांनी सांगितले की, आत्मसमर्पण करणारा नक्षलवादी पहाडसिंगवर मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र शासनाव्यतिरिक्त २५ लाख रुपयांची राशी एकट्या छत्तीसगड शासनाने जाहीर केली होती. दुर्ग रेंजच्या आयजीसमोर पहाडसिंगने आत्मसमर्पण केले आहे.१०० पेक्षा जास्त गुन्ह्याची नोंदमहाराष्ट्राच्या उत्तर गडचिरोली, गोंदिया भागात नक्षली नेता पहाडसिंग याचे नाव नक्षलवादासाठी आजही घेतले जाते. या नक्षलवाद्याची पत्नी सरपंच होती. तिच्यावर त्याच्या मित्रांनीच अविश्वास प्रस्ताव आणला होता. त्यामुळे तिला सरपंचपद गमवावे लागले होते. पत्नीचा पराभव झाल्यामुळे नाराज होऊन मित्रांना धडा शिकवण्यासाठी त्याने नक्षलवाद्यांशी हात मिळवले. त्यानंतर त्याने या भागात दहशत पसरविणे सुरू केले. याच भागात पोलिसांविरोधात अनेक हिंसक कारवायांचे नेतृत्व त्याने केले आहे. तो सीआरपीएफ जवानांच्या हत्यांसह ४० ते ४५ प्रमुख कारवायांमध्ये सहभागी होता. या घटनांची त्याच्यावर केवळ महाराष्ट्रात नोंद आहे. मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यातील गुन्ह्यांची आकडेवारी पाहिल्यास यादी आणखी लांब आहे. गडचिरोलीचे तत्कालीन पोलीस अधीक्षक सुवेज हक नवजीवन योजनेंतर्गत वर्ष-२०१२ मध्ये पहाडसिंगच्या आत्मसमर्पणासाठी त्याच्या घरी गेले होते. त्यांनी त्याच्या मुलींशी चर्चा केली होती. त्यावेळी एका मुलीने डॉक्टर बनण्याची इच्छा व्यक्त केली होती.हृदय परिवर्तन : सुवेज हकगडचिरोलीचे तत्कालीन पोलीस अधीक्षक आणि आताचे राज्याच्या दहशतवादी सेलचे पोलीस उपमहानिरीक्षक सुवेज हक यांनी सांगितले की, महाराष्ट्र शासनाने नवजीवन योजनेंतर्गत वर्ष-२०१२ मध्ये पहाडसिंगच्या दोन्ही मुलींची भेट घेतली होती. या योजनेंतर्गत त्याच्या दोन्ही मुलींना राज्याच्या वेगवेगळ्या भागात फिरविले होते. त्यांच्याच प्रयत्नाने अखेर पहाडसिंग याचे हृदय परिवर्तन झाले आणि त्याने शस्त्रे त्यागण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राज्यात नक्षलवादीविरोधी मोहिमेत कार्यरत अधिकारी आणि जवानांचे मनोबल वाढणार आहे.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीPoliceपोलिस