शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

झारखंडमधील नक्षल्यांनी केलेल्या स्फोटाचे हादरे देशभरातील रेल्वे ट्रॅकला; नागपूरसह सर्वत्र अलर्ट

By नरेश डोंगरे | Updated: December 22, 2023 23:52 IST

- घटनेच्या काही मिनिटांपूर्वी निघाली तेथून नागपूरकडे येणारी एक्सप्रेस - ज्ञानेश्वरी एक्सप्रेसच्या भीषण अपघाताच्या आठवणी ताज्या

नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: गुरुवारी रात्री झारखंडमधील डेरंवा - पाैसेता रेल्वे स्थानकादरम्यानच्या ट्रॅकला नक्षलवाद्यांनी भीषण स्फोट घडवून उडवून दिले. या घटनेच्या काही मिनिटांपूर्वीच नागपूरकडे येणारी टाटा-ईतवरी एक्सप्रेस घटनास्थळावरून निघाली होती, हे विशेष!

दरम्यान, या नक्षलवादी हल्ल्याचे हादरे देशभरातील रेल्वे ट्रॅकला बसले असून, खबरदारीचा उपायय म्हणून रेल्वे सुरक्षा दलाला अलर्ट देण्यात आला आहे. या सोबतच १३ वर्षांपूर्वी पश्चिम बंगालमधील मिदनापूर जिल्ह्यात घडलेल्या ज्ञानेश्वरी एक्सप्रेसच्या भीषण अपघाताच्या आठवणीही रेल्वे प्रशासन आणि प्रवाशांच्या मनात ताज्या झाल्या आहेत.

पश्चिम बंगालमधील मिदनापूर जिल्ह्यातून धावणाऱ्या ज्ञानेश्वरी एक्सप्रेसचा २८ मे २०१० ला भीषण अपघात झाला होता. नक्षलवाद्यांनी स्फोट घडवून रेल्वे ट्रॅक काढून घेतल्याने हा अपघात झाल्याची त्यावेळी चर्चा होती.

हावडा-कुर्ला लोकमान्य टिळक ज्ञानेश्वरी सुपर एक्सप्रेस हावडा ते मुंबई असा प्रवास करत होती. ती रुळावरून घसरल्यानंतर या गाडीने विरुद्ध दिशेने धावणाऱ्या मालगाडीला जोरदार धडक दिली होती. त्यावेळी १४८ लोकांचा मृत्यू झाला तर पावणेदोनशेहून जास्त प्रवासी जखमी झाले होते. या अपघातानंतर तीन डझनावर प्रवासी बेपत्ता झाले होते. त्यातील २४ प्रवाशांचा नंतर पत्ताच लागला नव्हता. आता या अपघाताला १३ वर्षे झाली. मात्र, या अपघाताच्या आठवणी आल्यास रेल्वे प्रशासन आणि रेल्वे प्रवासी अजूनही शहारतात.

गुरुवारी पहाटे झारखंडमधील रेल्वे ट्रॅकवर स्फोट घडवून नक्षलवाद्यांनी थर्ड रेल्वे लाईन उडवून दिल्याचे वृत्त सर्वत्र पसरले अन् त्यानंतर त्या भागात धावणाऱ्या रेल्वे गाड्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या नातेवाईकांच्या काळजाची धडधड सुरू झाली. कारण नागपूर विदर्भातून झारखंडमध्ये जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. येथून ईतवारी (नागपूर) स्थानकावरून टाटानगरसाठी आणि टाटानगरमधून नागपूर ईतवारी साठी रोज ट्रेन धावते. २४ तास या प्रवासाला लागतात.विशेष उल्लेखनीय म्हणजे, ही घटना घडली त्याच्या अगदी काही मिनिटांपूर्वी टाटा-ईतवारी एक्सप्रेस घटनास्थळावरून नागपूरकडे येण्यासाठी निघाली होती. सुत्रांच्या माहितीनुसार, स्फोट घडविण्यापूर्वी नक्षल्यांनी डेरंवा स्थानकाजवळ एक बॅनर लावले होते. टाटा ईतवारी एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये फसले आणि त्याच अवस्थेत रेल्वेगाडी नागपूरकडे निघाले.

नक्षल्यांचा रेल्वे ट्रॅकवरील राग

नक्षलवाद्यांचा रेल्वे ट्रॅकवरील राग तसा जुनाच आहे. गेल्या वर्षी, जानेवारी २०२२ मध्ये अशाच प्रकारे झारखंडमधील गिरिडीहजवळ मध्यरात्री नक्षलवाद्यांनी बॉम्बस्फोट करून रेल्वे ट्रॅक उडवून दिला होता. त्याअगोदर काही वर्षांपूर्वी ओरिसातील सुंदरगड जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी सुरुंग स्फोट करून राऊरकेलाकडे जाणारे रेल्वेरुळ उखडून टाकले होते.

आम्ही खबरदारी घेत आहोत

या स्फोटानंतर सर्वत्र अलर्ट आला असून, सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व खबरदारी आम्ही घेत आहोत, अशी माहितीवजा प्रतिक्रिया रेल्वे सुरक्षा दलाचे आयुक्त दीपचंद्र आर्य यांनी लोकमतशी बोलताना दिली.

टॅग्स :railwayरेल्वेnaxaliteनक्षलवादी