Navneet Rana admitted to Wockhardt Hospital, Nagpur | नवनीत राणा नागपूरच्या वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये दाखल

नवनीत राणा नागपूरच्या वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये दाखल


लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना सोमवारी रात्री नागपूरच्या वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सहा-सात दिवसांपूर्वी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याने त्या घरातच विलगीकरणात होत्या. मात्र सोमवारी रात्री त्यांना नागपुरात आणण्यात आले.
नवनीत राणा यांच्या दोन्ही मुलांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्या मुलांसाठी घरीच रहात होत्या. त्याच दरम्यान त्यांनाही ६ आॅगस्टला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी उपचारासाठी घरीच राहण्यास पसंती दिली होती. नवनीत राणा यांचे पती रवी राणा व त्यांच्या कुटुंबातील सहाजणांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान सोमवारी नवनीत राणा यांना अस्वस्थ वाटू लागल्याने नागपुरातील वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.

Web Title: Navneet Rana admitted to Wockhardt Hospital, Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.