शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेेंबर २०२५: आर्थिक लाभ होतील, मित्र व स्नेह्यांची भेट आनंददायी राहील.
3
पाकिस्तानची सौदी अरेबियानंतर आता आणखी एका मुस्लिम देशाशी हातमिळवणी? नवा 'प्लॅन' काय?
4
Kalyan: रेल्वेतून पडून जखमी; डॉक्टरांनी घरी पाठवले, काही तासांत मृत्यू!
5
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
6
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
7
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
8
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
9
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
10
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
11
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
12
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
13
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
14
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
15
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
16
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
17
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
18
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
19
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
20
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
Daily Top 2Weekly Top 5

नवरात्र स्पेशल: कर्करोगाला हरविणाऱ्या खऱ्या दुर्गा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 10:04 IST

कॅन्सरवर मात करणाऱ्या समाजातील अशा दुर्गांशी लोकमतने संवाद साधला. आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणारा त्यांचा अनुभव प्रत्येकासाठी प्रेरक असा आहे. ‘हार मानू नका, फक्त लढा’ हा संदेश त्यात नक्कीच मिळेल.

ठळक मुद्देदुर्धर आजाराशी लढण्याचा संदेशजीवनाचा दृष्टिकोन बदलणारा अनुभव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कर्करोग (कॅन्सर) म्हणजे शेवट हा गैरसमज समाजामध्ये आजही आहे. त्यामुळे एकदा का कॅन्सर झाला की, आता सगळं संपलं असा समज करून कोलमडणारे, आयुष्यच उद्ध्वस्त होणारीअसंख्य उदाहरणे आपल्या अवतीभवती दिसतील. यामध्ये निरक्षरच नाही तर बऱ्यापैकी सुशिक्षित लोकांचाही समावेश आहे. मात्र या आजारासमोर गुडघे टेकण्यापेक्षा आपल्या वाट्याला आलेलं हे संकट हसत हसत स्वीकारून त्याच्याशी दोन हात करणाऱ्या रणरागिणी कमी नाहीत. कदाचित कॅन्सर झाल्याचे पहिल्यांदा ऐकल्यानंतर त्यांनाही धक्का बसला असेल, संपूर्ण कुटुंबाची घालमेल झाली असेलही. पण ‘आयुष्यातील हाही एक लढा आहे आणि यात मी जिंकणारच’ हे आत्मबळ कॅन्सर नावाच्या शत्रूवर मात करण्यास त्यांना पुरेस होतं. यामध्ये कुटुंबाने दिलेला भक्कम आधार आणि सकारात्मकतेची जागृत ज्योत तेवत ठेवणाऱ्या हितचिंतकांचे शब्द, त्यांच्यासाठी मोलाचे ठरले. कॅन्सरवर मात करणाऱ्या समाजातील अशा दुर्गांशी लोकमतने संवाद साधला. आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणारा त्यांचा अनुभव प्रत्येकासाठी प्रेरक असा आहे. ‘हार मानू नका, फक्त लढा’ हा संदेश त्यात नक्कीच मिळेल.अभियानाचे बळप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ व कॅन्सर समोपचारक डॉ. रोहिणी पाटील यांनी विशेषत: ब्रेस्ट कॅन्सरबाबत जागृती अभियान राबविले आहे. त्या स्वत: या आजारातून सुखरूप बाहेर आल्या आहेत. त्यामुळे अशा कॅन्सर सर्व्हाईवल रुग्णांना एकत्रित करून त्यांच्या उदाहरणावरून महिलांमध्ये जागृतीचे कार्य त्यांनी स्वीकारले आहे. कॅन्सर हा धोकादायक आहेच, मात्र लवकर लक्ष देऊन वेळीच उपचार घेतले तर या धोक्यातून सुखरूप बाहेर पडता येते. त्यामुळे सेल्फ एक्झामीनेशन, मॅमोग्रॅफी आणि इतर आवश्यक चाचण्यांबाबत महिलांमध्ये जागृतीसाठी असंख्य शिबिरे त्यांनी शहरात, गावात घेतली आहेत. त्यांच्या पुढाकारातून कॅन्सरवर विजय मिळविणाऱ्यांचा ग्रुप समाजाला प्रेरक संदेश देत आहे.नवीन जीवन जगायला मिळालेधनवटे नॅशनल कॉलेजमघ्ये प्राध्यापक असलेल्या डॉ. संगीता जीवनकर यांनीही या संकटाचा सामना केला. कॅन्सरपीडित मैत्रिणीला भेटायला गेल्यानंतर आपल्याला हा आजार होईल, असे स्वप्नातही वाटले नव्हते. मात्र हे संकट माझ्यावर आले. बºयापैकी जागृती असल्याने दरवर्षी आरोग्य तपासणी करण्याची सवय होती. या तपासणीमध्ये ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचे कळले. हा संपूर्ण कुटुंबासाठी मोठा धक्का होता, एक रात्र रडण्यात गेली होती. मात्र याबाबत जागृत असल्याने ताबडतोब चाचण्या आणि उपचार सुरू केले. पती व मुलांचा भक्कम आधार पाठीशी होता. पुढे आॅपरेशन आणि किमोथेरेपीही घेतली. याच काळात पतीलाही कॅन्सरचे निदान झाले. मात्र न घाबरता दोघांनीही एकत्रितच उपचार घेतले. या आजाराच्या काळातही आम्ही आनंदी जगणे सोडले नाही. त्यामुळे दु:ख घेऊन भेटायला येणाऱ्यांनाच आश्चर्य वाटायचे. आज दोघेही आनंदी आयुष्य जगत आहोत. या आजारामुळे नवीन जीवन जगायला मिळाले.

आता मी मरणार ही भीती होतीसाबरा अजीम यांना वयाच्या साठाव्या वर्षी कॅन्सरने जखडले. कॅन्सर झाला की लोक मरतात, या नेहमीच्या गैरसमजानुसार ‘आता मी मरणार’ या भीतीने मनात घर केले होते. मात्र यावेळी पती, तिन्ही मुले व मुलगी यांनी सांत्वन करीत आधार दिला. पतींनी डॉक्टर मित्रांकडून या आजाराबाबत माहिती घेतली आणि नियमित चाचण्या करून आॅपरेशनची तयारी सुरू केली. ईदच्या एक दिवसापूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आणि ईदच्या दिवशी नव्या आयुष्याची भेट मिळाली. यानंतर किमोथेरेपी करण्याची भीती वाटत होती. मात्र सकारात्मक मार्गदर्शनामुळे ही भीतीही दूर झाली. आज आॅपरेशनला पाच वर्षे झाली असून, आता आरोग्यदायी सुदृढ आयुष्य जगत असल्याचे त्यांनी सांगितले.

भीतीमुळे कुणाला सांगितलेच नाहीएका शाळेत शिक्षिका असलेल्या मारिया ज्योती यांनी सांगितले, छातीत दुखत होते आणि गाठ असल्याची जाणीव होती. मात्र कॅन्सर निघाला तर... या भीतीमुळे वर्षभर कुणालाच काही सांगितले नाही. मात्र पुढे दुखणे वाढल्यामुळे पर्याय नव्हता. चाचणीमध्ये ब्रेस्ट कॅन्सर असल्याचे निदान झाले आणि भीती खरी ठरली. केस गळणे सुरू झाले, त्यामुळे प्रचंड निराश झाले होते. मात्र सकारात्मक मार्गदर्शनामुळे एक बळ निर्माण झाले आणि आॅपरेशनची तयारी सुरू केली. आॅपरेशनला आज दीड वर्ष झाले असून, मी पूर्वीप्रमाणे नॉर्मल आयुष्य जगत आहे. भीतीमुळे कोणताही आजार सहज विळख्यात घेतो व वाढत जातो. त्यामुळे भीती ठेवण्यापेक्षा तो बरा होईल, हा विश्वास बाळगणे आवश्यक असल्याचे त्या म्हणाल्या.

दोन्ही वेळा जिंकलेस्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. निर्मला वझे यांनी दोनदा या जीवघेण्या संकटाचा सामना केला आहे. वयाच्या ४१ व्या वर्षी ब्रेस्ट कॅन्सरने त्यांना विळख्यात घेतले होते. त्यावेळी मुलगी १० वर्षाची व मुलगा ८ वर्षाचा होता. धक्कादायक म्हणजे त्यांच्या मुलांना जीव लावणारी त्यांची बहीण यापूर्वी ब्रेस्ट कॅन्सरची बळी ठरली होती. त्यामुळे मावशीला गमावल्यानंतर आईवरही हे संकट आल्याने मुलांना मोठा धक्का बसला होता. ‘आता तूही आम्हाला सोडून जाणार’ हा भाबडा प्रश्न त्यांचा होता. मात्र यावेळी निर्मला यांनी स्वत:ला अधिक मजबूत केले. १९८८ ची ही गोष्ट. त्यावेळी हव्या त्या सुविधा नव्हत्या. मात्र योग्य मार्गदर्शनाद्वारे स्वत:चा उपचार सुरू केला. आॅपरेशन, पुढे किमोथेरेपीनंतर मुंबईला रेडिओथेरेपी घेतली. उपचारानंतर पूर्णपणे बऱ्या झालेल्या डॉ. निर्मला कॅन्सर झाल्याचे विसरल्याही होत्या. मात्र १७ वर्षानंतर पुन्हा त्यांच्यासमोर ब्रेस्ट कॅन्सरचे संकट ओढवले. मात्र अधिक मजबूत झालेल्या डॉ. वझे यांनी पुन्हा स्वत:च्या हिमतीने दुसऱ्यांदा कॅन्सरला पराभूत केले. भीती बाळगण्यापेक्षा आलेल्या संकटाला स्वीकारून त्याचा सामना करायचा, या सकारात्मक विचारानेच ही लढाई जिंकल्याचे त्या म्हणाल्या.

जे संकट आले, त्याच्याशी लढलेप्राध्यापक असलेल्या डॉ. बिपाशा घोषाल यांचा संघर्ष महत्त्वाचा आहे. लंग्ज कॅन्सरमुळे मृत्यूजवळ जाणाऱ्या वडिलांना पाहिल्यानंतर स्वत:ला कॅन्सर झाल्याचे कळल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांच्या मनात प्रचंड भीती आणि डोळ्यासमोर अंधार पसरला. मात्र कौटुंबिक डॉक्टरांच्या सकारात्मक मार्गदर्शनाने त्यांच्यात उपचार घेण्याची प्रेरणा निर्माण झाली. मुंबईला जाऊन सल्ला घेतला. त्यानंतर नागपूरला येऊन आॅपरेशन केले. किमोथेरेपीची भीती वाटत होती. मात्र जगण्यासाठी जे गरजेचे आहे ते करावेच लागेल, या विचाराने तेही यशस्वीपणे केले. आज दोन वर्षानंतर आनंदी आयुष्य जगत आहे. जे संकट आले, त्याच्याशी लढणे गरजेचे आहे. त्यामुळे डॉक्टरांवर विश्वास ठेवा व सकारात्मक राहा, असा संदेश त्यांनी दिला.

स्वीकारणेच कठीण होतेकेका रॉय या शिक्षिका आहेत. त्यांच्या शाळेत डॉ. पाटील यांच्या नेतृत्वात आयोजित तपासणी शिबिरादरम्यान त्यांना ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणे आढळून आली. पुढच्या आवश्यक चाचण्यांमधून खात्री झाली. नियमित व्यायाम, सायकलिंग व ट्रॅकिंग करीत असल्याने आपल्याला असा मोठा आजार होऊ शकतो, असे कधीच वाटले नाही. कॅन्सरची भीती असल्याने पती आणि मुलगा ही गोष्ट स्वीकारण्यास तयार नव्हते. मात्र जागरुकतेमुळे गय करण्यापेक्षा ताबडतोब उपचार करण्यावर आम्ही भर दिला. दोनच महिन्यांपूर्वी त्यांचे आॅपरेशन करण्यात आले. ओंकोटाईप डीएस ही चाचणी केल्यानंतर आता किमोथेरेपीची गरज नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. आॅपरेशनच्या दोनच महिन्यानंतर त्यांचे आयुष्य पूर्वपदावर आले. आज या आजाराबाबत असलेली भीती नाहीशी झाल्याचे त्या म्हणाल्या.

टॅग्स :Navratriनवरात्री