नाट्य परिषद नागपूर शाखेचा वर्धापनदिन सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:06 IST2021-04-17T04:06:59+5:302021-04-17T04:06:59+5:30
- पुरस्कारांचे वितरण लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नागपूर शाखेचा वर्धापनदिन व पुरस्कार वितरण ...

नाट्य परिषद नागपूर शाखेचा वर्धापनदिन सोहळा
- पुरस्कारांचे वितरण
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नागपूर शाखेचा वर्धापनदिन व पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर यंदा हा सोहळा शाखेच्या कार्यालयात अगदी मोजक्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी शाखेचे अध्यक्ष प्रफुल्ल फरकसे, उपाध्यक्ष शेखर सावरबांधे, कोषाध्यक्ष संजय रहाटे व प्रमुख कार्यवाह नरेश गडेकर उपस्थित होते. वर्धापनदिन सोहळ्यानंतर पुरस्कार्थ्यांना त्यांच्या घरी जाऊन पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. ज्येष्ठ रंगकर्मी लक्ष्मीकांत देशपांडे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर ज्येष्ठ रंगकर्मी मृणाल पुराणिक यांना ज्येष्ठ रंगकर्मी पुरस्कार प्रदान करण्यात आला. तत्पश्चात नाट्य व सिने अभिनेते देवेंद्र दोडके यांना श्रेष्ठ रंगकर्मी, संगीतकार चारुदत्त जिचकार यांना रंगसेवा पुरस्कार, समीक्षा लेखक पुरस्काराने राम भाकरे यांना त्यांच्या घरी जाऊन पुरस्कार प्रदान करण्यात आला. सर्वोत्कृष्ट लेखक पुरस्कार श्याम पेठकर, झाडीपट्टी ज्येष्ठ रंगकर्मी पुरस्कार दिलीप वढे, श्रेष्ठ रंगकर्मी पुरस्कार अनिरुद्ध वनकर यांना लवकरच पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
...............