शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

नाट्यदिंडीने दुमदुमली नाट्यनगरी : वैदर्भीय संस्कृतीचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 23:16 IST

९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाला शुक्रवारी दिमाखदार नाट्यदिंडीने सुरुवात झाली. शहरातील शिवाजी महाराजांचा पुतळा, गांधीगेट, महाल येथून दुपारी नाट्यदिंडी निघाली व माय मराठीला अभिभूत करणाऱ्या सोहळ्याची झलक प्रेक्षकांनी अनुभवली. लोककलांसह वैदर्भीय व मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शनच या दिंडीतून प्रेक्षकांना झाले. शहरातील सर्व रंगकर्मी अगदी उत्साहात या दिंडीमध्ये सहभागी झाले होते. सोबतच पुण्या-मुंबईतील चित्रपट व नाट्य क्षेत्रातील दिग्गज कलावंतांनी या मांदियाळीत हजेरी लावल्याने दिंडीच्या उत्साहात भर पडली. कलारसिक नागपूरकरांनी डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या या दिमाखदार सोहळ्याचा अनुभव घेतला.

ठळक मुद्दे रंगकर्मी, चित्रपट कलावंत व कलारसिकांचा जोशपूर्ण सहभाग

निशांत वानखेडे/मंगेश व्यवहारे/लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाला शुक्रवारी दिमाखदार नाट्यदिंडीने सुरुवात झाली. शहरातील शिवाजी महाराजांचा पुतळा, गांधीगेट, महाल येथून दुपारी नाट्यदिंडी निघाली व माय मराठीला अभिभूत करणाऱ्या सोहळ्याची झलक प्रेक्षकांनी अनुभवली. लोककलांसह वैदर्भीय व मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शनच या दिंडीतून प्रेक्षकांना झाले. शहरातील सर्व रंगकर्मी अगदी उत्साहात या दिंडीमध्ये सहभागी झाले होते. सोबतच पुण्या-मुंबईतील चित्रपट व नाट्य क्षेत्रातील दिग्गज कलावंतांनी या मांदियाळीत हजेरी लावल्याने दिंडीच्या उत्साहात भर पडली. कलारसिक नागपूरकरांनी डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या या दिमाखदार सोहळ्याचा अनुभव घेतला.दुपारपासूनच ‘आम्ही मराठी' ढोलताशा पथकाच्या स्वयंसेवकांच्या दमदार वादनाने परिसरात वातावरण निर्मिती केली होती. यादरम्यान मान्यवरांच्या हस्ते कलेची देवता नटराजाचे पूजन करण्यात आले व रंगबिरंगी फुग्यांच्या मदतीने नाट्यसंमेलनाचा फलक आकाशात सोडण्यात आला. यावेळी ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी, मावळत्या अध्यक्षा कीर्ती शिलेदार, राजे मुधोजी भोसले, डॉ. गिरीश गांधी, अ. भा. मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी, नागपूरचे प्रमुख कार्यवाह नरेश गडेकर, नाट्य समेलनाचे मुख्य निमंत्रक प्रफुल्ल फरकासे, प्रमोद भुसारी, सुनील महाजन, सतीश लोटके, अशोक ढगे आदी प्रामुख्याने उपस्थित होाते. पालखी पूजनानंतर शिवरायांच्या पुतळ्याला माल्यार्पण करीत नाट्यदिंडीला प्रारंभ झाला. प्रेमानंद गज्वी, प्रसाद कांबळी, कीर्ती शिलेदार, राजे मुधोजी भोसले यांनी दिंडीतील नटराजाची पालखी खांद्यावर घेतली होती.मोहन आगाशे, मोहन जोशी, के दार शिंदे, भरतजाधव, प्रेमा किरण, वैभव मांगले, मंगेश कदम, अलका कुबल-आठल्ये, रवींद्र बेर्डे, राजन भिसे, संदीप पाठक, रेशम टिपणीस, तुषार दळवी, संतोष जुवेकर, अभिजित गुरू, अविनाश नारकर, तेजश्री प्रधान, मधुरा वेलणकर, ऋतुजा देशमुख यांच्यासह नाट्य व सिनेक्षेत्रातील दिग्गज या दिंडीत सहभागी झाले होते.दिंडीच्या अग्रभागी ढोल पथक, त्यामागेमाग कुमारिका चालत होत्या. टेकडी गणेशाचा चित्ररथ, यवतमाळच्या लोककलावंतांचा संच, युथ कला निकेतनच्या विद्यार्थ्यांनी आदिवासी नृत्य सादर केले. चिमासाहेब भोसले आखाड्याच्या मुलामुलींचे लाठी प्रदर्शन, गुरू तेगबहादूर गटका पथकाचे चित्तथरारक सादरीकरण तसेच वारकरी पथकांच्या भजनांनी आनंद संचारला. धनवटे रंगमंदिर, झिरोमाईलची प्रतिकृती आकर्षणाचे केंद्र ठरली. सेंट विन्सेंट स्कूलचे वारकरी आणि लेझिम पथकाचा समावेश होता. नागपूरची ओळख असलेली काळी व पिवळी मारबत तसेच बडग्यानेही सर्वांचे लक्ष वेधले. खास विदर्भात साजरा करण्यात येणाºया तान्हा पोळ्याचा लाकडी बैल येथे होता. अगदी नाचत गाजत दिंडीचे संमेलन स्थळाच्या राम गणेश गडकरी नाट्य नगरीत समापन झाले.

टॅग्स :Natakनाटकmarathiमराठी