शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
3
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
4
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
5
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
6
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
7
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
8
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
9
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
10
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
11
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
12
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
13
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
14
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
15
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
16
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
17
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
18
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
19
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
20
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण

देशव्यापी संप : नागपुरात शासकीय कार्यालये, विमा, बँका ओस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 23:10 IST

कामगार संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी संपाचा परिणाम नागपुरातही जाणवला. नागपुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासह एकूणच शासकीय कार्यालये आयुर्विमा महामंडळ आणि बँका ओस पडल्या होत्या.

ठळक मुद्देसंपाला भव्य प्रतिसाद, शासकीय कामे खोळंबली, संविधान चौकात जाहीर सभा

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कामगार संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी संपाचा परिणाम नागपुरातही जाणवला. नागपुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासह एकूणच शासकीय कार्यालये आयुर्विमा महामंडळ आणि बँका ओस पडल्या होत्या. त्यामुळे शासकीय कामांसह बँकेतील कामेही खोळंबली. देशव्यापी संपामुळे नागरिकही फारसे कार्यालयाकडे भटकले नाहीत. केंद्र व राज्य सरकारसह बँक व विमा क्षेत्रातील ९० टक्के कर्मचारी या संपात सहभगी असल्याने या संपाचा चांगलाच परिणाम जाणवला.

देशातील १० केंद्रीय कामगार संघटनांनी केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणाविरुद्ध देशव्यापी संपाचे आवाहन केले होते. तर शेतकरी संघटनेच्या समन्वय संघर्ष समितीतर्फे ग्रामीण भागात भारत बंदचे आवाहन करण्यात आले होते. आयटक, सीआयटीयू, इंटक, राज्य सरकारी कर्मचारी, एआययूटीयूसी, टीयूसीसी, एआयटीयूओ आदींसह विविध संघटनाच्या संयुक्त कृती समिती नागपूरसह विविध संघटना यात सहभागी झाल्या होत्या. सकाळी पाऊस पडत असल्याने दुपारी १२ वाजेपासून केंद्रीय, राज्य सरकारी कर्मचारी, अंगणवाडी, आशा, शालेय पोषण आहार, बांधकाम कामगार, कारखाने कामगार आदी संपात सहभागी झाले होते. 
सर्व कामगारांना दरमहा किमान २१ हजार रुपये वेतन मिळावे, सर्व कामगारांना दरमहा १० हजार रुपये पेन्शन मिळावी, स्थायी पदावर काम करीत असलेल्या कंत्राटी मजुरांना नियमित करण्यात यावे, शासकीय विभागांमधील रिक्त पदे तातडीने भरण्यात यावी, लेबर कोड बिल परत घेण्यात यावे, रेल्वे, संरक्षण, विमा, बँक, सार्वजनिक क्षेत्र, टेलिकॉम आदी विभागांच्या खासगीकरणावर रोख लावण्यात यावी, स्कीम वर्कर्सला शासकीय कर्मचारीचा दर्जा मिळावा, वाढत्या महागाईवर रोख लावण्यात यावी, सार्वजनिक वितरण यंत्रणा आणखी मजबूत करावी, मनरेगाअंतर्गत किमान वेतन दररोज ६०० व २०० दिवस देण्यात यावे आदी मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आले होते.विविध कामगारांनी व कर्मचाऱ्यांनी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या बॅनरखाली संविधान चौकात एकत्र येऊन आपल्या मागण्यांसाठी आवाज बुलंद केला. यावेळी केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यात आला. विश्वनाथ आसई, अशोग दगडे, मोहन शर्मा, श्याम काळे, एस.क्यू. जमा, मारोती वानखेडे, माधव भोंडे, विनोद पटले यांच्या अध्यक्षतेखली जाहीर सभा पार पडली. यावेळी कर्मचाऱ्यांचे नेते जयवंत गुरवे, विमा कर्मचाºयांचे नेते प्रशांत दीक्षित, केंद्रीय कर्मचाºयांचे नेते गुरुप्रीत सिंग, चंद्रशेखर मौर्य, अंगणवाडी कर्मचारी नेत्या वनिता कापसे, आशा कर्मचाºयांच्या नेत्या मंगला पांडे, मंगला लोखंडे, दिलीप देशपांडे, प्रशांत पवार यांच्यासह रेल्वे लोको पायलट युनियन, एनआरएचएम, कामगार एमआयडीसी, पाणलोट कामगार, शासकीय, खासगी कंत्राटी कामगार संघटनांच्या नेत्यांनी मार्गदर्शन करीत केंद्र सरकारच्या धोरणावर प्रहार केला.बँकेची सेवा ठप्पबँक क्षेत्रातील दोन प्रमुख कर्मचारी संघटना एआयईबीए आणि बीईएफआय तसेच अधिकारी संघटना एआयबीओए आयएनबीईएफ व आयएनबीओसी या राष्ट्रव्यापी संपात सहभागी झाल्या होत्या. बँक क्षेत्रातील सर्व कर्मचाºयांसह जवळपास १२०० अधिकारी सहभागी झाले होते. त्यामुळे नागपुरातील बँक सेवा पूर्णपणे प्रभावित झाली होती. देशव्यापी संप असल्याने ग्राहकही तसे बँककडे फारसे फिरकले नसल्याचे दिसून आले. कॉ. सत्यशील रेवतकर यांच्या नेतृत्वात सुरेश बोभाटे, नागेश दंडे, जयवंत गुरवे, जगदीशन, मिलिंद वासनिक, शांडिल्य अय्यर, वीरेंद्र गेडाम, सत्यप्रकाश तिवारी, कृष्ण शेंडके, नरेंद्र भुजाडे, अशोक शेंडे, सुजाता गेडाम, नारायण उमरेडकर, अंजली राणा आदींसह मोठ्या संख्येने अधिकारी-कर्मचारी सहभागी झाले होते.आयुर्विमा सेवा कोलमडलीदेशभरातील कामगारांनी पुकारलेल्या संपात नागपुरातील आयुर्विमा कर्मचारीही सहभागी झाले होते. सर्व कर्मचारी संपात सहभागी झाल्याने आयुर्विमा सेवा ठप्प झाली होती. नागपूर विभागीय कार्यालयात शुकशुकाट होता. भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या कस्तूरचंद पार्कसमोरील मुख्यालयासमोर द्वारसभा घेण्यात आली. यावेळी निदर्शने करण्यात आली. असोसिएशनचे क्षेत्रीय अध्यक्ष अनिल ढोकपांडे, रमेश पाटणे, नेहा मोटे, नरेश अडचुले, अभय पाटणे, शिवा निमजे, वाय.आर. राव, राजेश विश्वकर्मा, विवेक जोशी, अभय पंडे, अशोक कालभोरे, मनोहर पवनीकर, जी. हरीश शर्मा, हिना जिभकाटे, संजय लांजेवार, लक्ष्मण मौंदेकर, महेंद्र राजपूत, उर्मिला नायडू, राजेंद्र जाधव, मिलिंद कुमार, संदीप लातूरकर आदी उपस्थित होते. राष्ट्रव्यापी संपामध्ये आॅल इंडिया नॅशनल लाईफ इन्शुरन्स, एम्प्लॉईज फेडरेशन इंटकसह वाम मोर्चाप्रणीत आणि सेनाप्रणीत कामगार संघटना सहभागी झाल्या होत्या. त्यामुळे जीवन विमा कार्यालय ओस पडले होते. यासोबतच ई-कॉमर्स क्षेत्रात कार्यरत अ‍ॅमेझॉन, स्विग्गी, फ्लिपकार्ट, झोमॅटो, ओला, कुबेर, यात अ‍ॅप बेस्ड कामगारसुद्धा या संपात सहभागी झाले होते, असे अ‍ॅप कॅब अ‍ॅण्ड ई-कॉमर्स वर्कर्स इंटरनॅशनलचे राष्ट्रीय महासचिव राजेश निंबाळकर यांनी सांगितले.जिल्हाधिकारी कार्यालयातील कामे खोळंबलीराष्ट्रव्यापी संपात जिल्हाधिकारी कार्यालयातील ९० टक्के कर्मचारी सहभागी झाले असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात कामानिमित्त आलेल्या नागरिकांना चांगलाच फटका बसला. बहुतांश कर्मचारीच नसल्याने विविध प्रमाणपत्रांसाठी आलेल्या नागरिकांना फटका बसला. दरम्यान राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, सरकारी निमसरकारी कर्मचारी व शिक्षक शिक्षकेतर संघटना समन्वय समितीने संप १०० टक्के यशस्वी झाल्याचा दावा केला. आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय, मेडिकल कालेज, डागा, मेयो, मेयो हॉस्पिटल, जिल्हााधिकारी कार्यालय, वन भवन, जुने सचिवालय परिसर, पाटबंधारे परिसर, मुद्रणालये, फॉरेन्सिक, धर्मादाय, आयटीआय, टेक्निकल हायस्कूल, सामाजिक न्याय विभाग आदी ठिकाणी शुकशुकाट असल्याचा दावाही संघटनेने केला.आंदोलनात संघटनेचे राज्याचे अध्यक्ष अशोक दगडे, जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर महल्ले, नारायण समर्थ, बुधाजी सुरकर, नाना कडवे, यशवंत कडू, सुनील व्यवहारे, प्रल्हाद शेंडे, केशव शास्त्री, मंगला जाळेकर, मनीश किरपाल, स्नेहल खवले, राजेंद्र ठाकरे, प्रशांत राऊत, शाम वांदिले, कल्याण सचिव, राजेश मते, राजेंद्र ढोमणे आदींह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.

टॅग्स :Employeeकर्मचारीStrikeसंप