शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विमानतळावर २४ कोटींचे अंमली पदार्थ जप्त

By मोरेश्वर मानापुरे | Updated: August 22, 2023 19:08 IST

महसूल गुप्तचर संचालनालयाची कारवाई

नागपूर : नागपूरच्या महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी पहाटे शारजाहून एअर अरेबिया विमानाने नागपुरात आलेल्या एका भारतीय नागरिकाला अटक करून त्याच्याकडून व्यापार प्रतिबंधित अ‍ॅम्फेटामाइन प्रकारातील २४ कोटींहून अधिक मूल्याचे ३.०७ किलो पदार्थ जप्त केले. हा व्यक्ती केनियातल्या नैरोबी येथून शारजा, यूएईमार्गे नागपुरात आला होता.

डीआरआयने माहिती ठेवली गुप्तया भारतीय नागरिकाला रविवारी ताब्यात घेण्यात आल्यानंतर कारवाईची माहिती गुप्त ठेवून या प्रकरणाशी संबंधित एका नायजेरियन नागरिकाला २१ ऑगस्टला पश्चिम दिल्लीच्या सुभाषनगर परिसरातून अटक केली. या नायजेरियन नागरिकाला प्रतिबंधित पदार्थ पुरवला जाणार होता. भारतीय व्यक्तीला अटक करून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, नागपूर यांच्यासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला शुक्रवारपर्यंत डीआरआय कोठडी सुनावली. शिवाय सर्व प्रक्रिया पूर्ण करून नायजेरियन नागरिकाला बुधवारपर्यंत नागपुरात आणण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

आयताकृती पुठ्ठ्याच्या खोक्यात लपविला होता अंमली पदार्थशारजाहून एअर अरेबियाच्या क्रमांक जी९-४१५ विमानाने नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या प्रवाशाने त्याच्या वैयक्तिक सामानात ठेवलेल्या आयताकृती पुठ्ठ्याच्या खोक्यात वेष्टित पोकळ धातूच्या रोलरमध्ये हा प्रतिबंधित पदार्थ लपवला होता. अ‍ॅम्फेटामाइन हा अंमली औषधीद्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणार पदार्थ कायदा, १९८५ च्या अनुसूची ह्यआयह्ण अंतर्गत समाविष्ट असलेला एक सायकोट्रॉपिक (व्यक्तीच्या मनावर परिणाम करणारा) पदार्थ असून त्याचा व्यापार प्रतिबंधित आहे.

यूएईमध्ये गेलेल्या भारतीय नागरिकांनी एअर एरेबियाच्या विमानातून पेस्ट स्वरूपात सोन्याची तस्करी केल्याची अनेक प्रकरणे आहेत. अनेकांना नागपूर विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय) आणि केंद्रीय सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. पण रविवारी शारजाहून विमानाने नागपुरात अंमली पदार्थ आणलेल्या भारतीय युवकाला अटक केल्याचे पहिलेच प्रकरण असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :nagpurनागपूरDrugsअमली पदार्थCrime Newsगुन्हेगारी