नाेकराने केली चाेरी, २.१५ लाख लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:10 IST2021-09-26T04:10:09+5:302021-09-26T04:10:09+5:30

कन्हान : घरातील नाेकराने चाेरी करीत २ लाख १५ हजार रुपये घेऊन पाेबारा केला. ही घटना कन्हान पाेलीस ठाण्याच्या ...

Nakra has stolen Rs 2.15 lakh | नाेकराने केली चाेरी, २.१५ लाख लंपास

नाेकराने केली चाेरी, २.१५ लाख लंपास

कन्हान : घरातील नाेकराने चाेरी करीत २ लाख १५ हजार रुपये घेऊन पाेबारा केला. ही घटना कन्हान पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील हनुमाननगर, कन्हान येथे १९ सप्टेंबरला दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

महेंद्रसिंग आनंद राजपूत (२९, रा. सरवडी, ता. पचपदरा, जि. बाडमेर, राजस्थान, ह.मु. अलका मनाेज काकडे यांच्या घरी, हनुमाननगर, कन्हान) यांनी किरायाने राहत असलेल्या घरी एका डब्यामध्ये राेख २ लाख १५ हजार रुपये ठेवले हाेते. दरम्यान, त्यांचा नाेकर आराेपी ओमप्रकाश जयसुखराम बिश्नाेई याने घरातील डब्यात ठेवलेले राेख २ लाख १५ हजार रुपये घेऊन गावी पळून गेला. याप्रकरणी महेंद्रसिंग राजपूत यांच्या तक्रारीवरून कन्हान पाेलिसांनी आराेपीविरुद्ध भादंवि कलम ३८१ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, आराेपीचा शाेध सुरू केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पाेलीस उपनिरीक्षक शेख करीत आहेत.

Web Title: Nakra has stolen Rs 2.15 lakh