नागपुरातील नाईक तलाव-बैरागीपुरा, मेहबूबपुरा व संघर्षनगर परिसर सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 20:53 IST2020-05-29T20:51:59+5:302020-05-29T20:53:33+5:30
महापालिकेच्या सतरंजीपुरा झोनमधील प्रभाग क्रमांक ७ मधील नाईक तलाव-बैरागीपुरा व आसीनगर झोनमधील प्रभाग ३ मधील मेहबूबनगर, संघर्षनगर या परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने व त्याचा प्रादुर्भाव शहरातील इतर भागात पसरू नये, या करिता सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने व सुरक्षेसाठी हा परिसर सील करण्याचे आदेश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जारी केले आहेत.

नागपुरातील नाईक तलाव-बैरागीपुरा, मेहबूबपुरा व संघर्षनगर परिसर सील
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या सतरंजीपुरा झोनमधील प्रभाग क्रमांक ७ मधील नाईक तलाव-बैरागीपुरा व आसीनगर झोनमधील प्रभाग ३ मधील मेहबूबनगर, संघर्षनगर या परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने व त्याचा प्रादुर्भाव शहरातील इतर भागात पसरू नये, या करिता सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने व सुरक्षेसाठी हा परिसर सील करण्याचे आदेश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जारी केले आहेत.
शासकीय व निमशासकीय सेवेतील अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचारी, आवश्यक तातडीची वैद्यकीय कारणे तसेच अंत्यविधी, वैद्यकीय सेवेशी संबंधित खासगी डॉक्टर, परिचारिका, मेडिकल स्टोअर्स दुकानदार, पॅथॉलॉजिस्ट, रुग्णवाहिका, पोलिस विभागामार्फत पासधारक असलेले जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारे व्यक्ती यांना या आदेशातून वगळण्यात आले आहे.
मेहबूबनगर- संघर्षनगर प्रतिबंधित क्षेत्र
दक्षिणपश्चिम -टिपू सुलतान चौक
दक्षिणपूर्वेस-शिवाजी चौक
पूर्वेस-प्लॉट क्रमांक ११७, अब्दुल अजीज अंसारी यांचे घर
उत्तरपूर्वेस -एस.एन.के.जी. इंजिनिअरिंग वर्क्स
उत्तरपश्चिम-४१६, शेख सलीम यांचे घर
पश्चिमेस -शाही ट्रॅव्हल्स
नाईक तलाव-बैरागीपुरा प्रतिबंधित क्षेत्र
उत्तरपूर्वेस -रमेश अहिरकर यांचे घर
पूर्वेस -तावडे यांचे घर
पूर्वेस -गीरमाजी सावजी
दक्षिणपूर्वेस -मनपा गार्डन
दक्षिणपश्चिमेस -केसरवानी यांचे घर
पश्चिमेस -विनोद माहुरे यांचे घर
उत्तरपश्चिमेस-गोपाल गाते यांचे घर