नागपूरचे  झिरो माईल्स मेट्रो स्टेशन ठरणार आकर्षणाचे केंद्र 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 09:02 PM2018-05-18T21:02:10+5:302018-05-18T21:04:19+5:30

महामेट्रोच्या नागपूर मेट्रो प्रकल्पांतर्गत उभारण्यात येणारी झिरो माईल्स स्टेशनची अद्वितीय इमारत आधुनिक वास्तुकलेची साक्ष देणारी असून नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. स्टेशनचे बांधकाम वेगात सुरू असून तळमजल्याचे बांधकाम पूर्ण झाले आहे.

Nagpur's Ziro Miles Metro station will be the attraction center | नागपूरचे  झिरो माईल्स मेट्रो स्टेशन ठरणार आकर्षणाचे केंद्र 

नागपूरचे  झिरो माईल्स मेट्रो स्टेशन ठरणार आकर्षणाचे केंद्र 

Next
ठळक मुद्दे२० मजली इमारत : विविध मजल्यावर २२४ कारचे पार्किंग

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : महामेट्रोच्या नागपूर मेट्रो प्रकल्पांतर्गत उभारण्यात येणारी झिरो माईल्स स्टेशनची अद्वितीय इमारत आधुनिक वास्तुकलेची साक्ष देणारी असून नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. स्टेशनचे बांधकाम वेगात सुरू असून तळमजल्याचे बांधकाम पूर्ण झाले आहे.
हेरिटेज वॉकद्वारे कनेक्टिव्हिटी
२० मजली स्टेशनच्या इमारतीत खासगी हॉटेल्स, रेस्टॉरंट, व्यावसायिक स्थळे, कार्यालये, बँक्वेट हॉलची निर्मिती करण्यात येणार आहे. १२ हजार चौरस मीटर जागेवर बांधकाम करण्यात येत आहे. इमारतीच्या पहिल्या मजल्यावर मेट्रो स्टेशन राहणार आहे. ५,३०० चौरस मीटर जागेवर जवळपास ४,५०० चौरस मीटरचे बांधकाम वेगाने सुरू असून ते लवकरच पूर्ण होईल. स्टेशनवर पोहोचण्यासाठी स्टेशन बाहेरील परिसरात आकर्षक हेरिटेज वॉक तयार करण्यात येत आहे, त्यामुळे नागरिकांना स्टेशनपर्यंत पोहोचविण्यासाठी कनेक्टिव्हिटी मिळेल. स्टेशनरील भिंती, प्रवेश व निर्गमन संरचनाचे कार्य नियोजित वेळेत पूर्ण केले जात असून आतापर्यंत झालेल्या कार्याप्रती समाधान व्यक्त करण्यात येत आहे. मेट्रो अधिकाऱ्यांतर्फे वेळोवेळी बांधकामाची पाहणी करण्यात येत आहे. स्टेशनच्या बांधकाम कार्यात कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची परिपूर्ण खबरदारी घेण्यात येत आहे.
आठ एस्केलेटर, दहा लिफ्ट
स्टेशनवर तळमजल्यासह एकूण २० मजली इमारत प्रस्तावित आहे. या भव्य इमारतीत आठ एस्केलेटर आणि दहा लिफ्टची सोय राहील. नागपूर शहराच्या मध्यभागी पार्किंगची समस्या लक्षात घेता इमारतीत वाहनांच्या पार्किंगसाठी भरपूर जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. स्टेशनच्या विविध मजल्यावर २४४ कार सहज पार्क करता येतील. तसेच दुचाकी वाहनासाठीदेखील पर्याप्त जागा राहील. ज्याप्रमाणे खापरी मेट्रो स्टेशन व्हिक्टोरियन वास्तुकलेच्या शैलीवर आधारित आहे, त्याचप्रमाणे मेट्रोच्या या २० मजली झिरो माईल स्टेशनची अद्वितीय इमारत आधुनिक वास्तुकलेची साक्ष देणारी ठरणार आहे.
स्केटर्सनी दिला स्वच्छता व रस्ता सुरक्षेचा संदेश
महामेट्रो नागपूर आणि गांधीबाग स्केटिंग क्लबतर्फे गुरुवारी नागपूर मेट्रोशी संबंधित कार्यगुणांची ‘स्केटिंग संदेश रॅली’ आणि या कार्यविभागातील नागरिकांसाठी ‘मेट्रो संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन गुरुवारी करण्यात आले. स्केटर्सनी स्वच्छता आणि रस्ता सुरक्षेचा संदेश दिला. सुनील तिवारी यांनी प्रकल्पाची माहिती दिली. यावेळी आ. विकास कुंभारे, उपमहापौर दीपराज पार्डीकर, नगरसेवक दयाशंकर तिवारी, शैलेन्द्र पाराशर, उपेंद्र वर्मा व महामेट्रो नागपूरच्या रिच-४ चे मुख्य प्रकल्प व्यवस्थापक एम. सुरेश, वरिष्ठ सेक्शन अभियंते राजेश तभाने, स्केटर्स आणि नागरिक उपस्थित होते.

Web Title: Nagpur's Ziro Miles Metro station will be the attraction center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.