शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील अभावग्रस्त मुलींना नागपूरचे ‘स्लम साॅकर’ देणार दिशा

By निशांत वानखेडे | Updated: June 25, 2025 19:28 IST

ऑस्ट्रेलियने संस्थेचे सहकार्य : डेप्युटी काउन्सेल जनरल ख्रिश्चन जॅक यांची बारसे यांच्या संस्थेला भेट

नागपूर : दैनंदिन जीवनात वाटचाल करताना महिलांना अनेक लैंगिक, शारीरिक, मानसिक आव्हानांचा सामना करावा लागताे. त्यातही झाेपडपट्ट्या किंवा आर्थिक दुर्बळ वर्गातील मुलींच्या आयुष्याची वाट खडतर असते. मुंबईतील अशाच अभावग्रस्त मुलींच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी नागपूरची ‘स्लम साॅकर’ ही संस्था कार्य करणार आहे.

विजय बारसे यांनी स्थापन केलेली स्लम साॅकर (क्रीडा विकास संस्था) खेळांच्या माध्यमातून या मुलींचा आत्मविश्वास वाढवून आयुष्याची दिशा बदलविण्यासाठी प्रयत्न करेल. यासाठी ऑस्ट्रेलियन ‘डायरेक्ट एड प्राेग्राम’ ही संस्था सहकार्य करणार आहे. यासाठीच ऑस्ट्रेलियन डेप्युटी काउन्सेल जनरल ख्रिश्चन जॅक यांनी बुधवारी विजय बारसे यांच्या बाेखारा, गाेधनी रेल्वे येथील संस्थेच्या परिसराला भेट दिली. त्यांनी क्रीडा विकास संस्थेला मुंबईतील उपक्रम राबविण्यासाठी सहकार्याचे प्रमाणपत्र दिले. यावेळी संस्थेचे सीईओ डाॅ. अभिजित बारसे व शक्ति गर्ल्स प्राेग्रामच्या हेड महिमा बारसे उपस्थित हाेते.

महिमा बारसे यांनी सांगितले, क्रीडा विकास संस्थेने शक्ति गर्ल्स प्राेग्रामच्या माध्यमातून यापूर्वी काेलकाता, दिल्ली, चेन्नई आदी शहरात क्रीडा उपक्रमांच्या माध्यमातून गरीब मुलींच्या व्यक्तिमत्त्वाला आकार दिला आहे. या कार्यात ऑस्ट्रेलियाच्या संस्थेचे सहकार्य राहिले आहे. यापुढे १ जुलै २०२५ ते ३१ मार्च २०२६ पर्यंत वर्षभर मुंबईत उपक्रम राबविण्यात येणार आहे. याद्वारे शहरातील अभावग्रस्त समाजाच्या २०० मुलींच्या जीवनात अमुलाग्र बदल घडविण्याचा विश्वास महिमा बारसे यांनी व्यक्त केला. या मुलींच्या शिक्षणापासून शारीरिक, मानसिक व लैंगिक समस्यांवर कार्य करून त्यांचा आत्मविश्वास वाढवून व्यक्तिमत्वात परिवर्तन घडविण्यात येईल. त्यांना टीम बिल्डिंग व समस्या साेडविण्याचे काैशल्य शिकविण्यात येईल. विविध क्रीडा प्रकारातील महिला खेळाडूंची प्रेरणा त्यांच्या जागविण्यात येईल. यासाठी स्लम साॅकरच्या आधीच्या उपक्रमातून ट्रेन्ड झालेल्या मुली राेल माॅडेल म्हणून काम करणार आहेत. वस्त्या, शाळांमध्ये जाऊन कार्य केले जाणार असल्याचेही महिमा बारसे यांनी स्पष्ट केले.

यावेळी भेटीसाठी आलेल्या ख्रिश्चन जॅक यांनी संस्थेच्या बाेखारा, गाेधनी रेल्वे येथील परिसरात स्लम साॅकरचे कर्मचारी व सहभागींसाेबत फूटबाॅल खेळण्याचा मनसाेक्त आनंद लुटला. अभावग्रस्त मुलींना मेंटल हायजिन ते अनेक समस्यांचा सामना करावा लागताे. या मुलींमध्ये खेळांच्या माध्यमातून आत्मविश्वास वाढविला जाऊ शकताे, असा विश्वास ख्रिश्चन जॅक यांनी यावेळी व्यक्त केला.

टॅग्स :nagpurनागपूर