लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ज्येष्ठ पत्रकार, इनफॉर्मेशन ब्युरो आॅफ इंडियाचे माजी संचालक तसेच आॅल इंडिया रेडिओचे माजी सहसंचालक हरीश शिवराम कांबळे यांचे सोमवारी दुपारी निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते.अन्न व औषधी विभागाच्या आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांचे ते वडील तर शासनच्या एमएमआरडी मुंबईचे संचालक प्रवीण दराडे यांचे ते सासरे होते. त्यांच्या मागे पत्नी हेमा कांबळे, मुलगा पंकज, मुलगी, जावई व मोठा आप्त परिवार आहे.यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील धानकी हे त्यांचे मूळ गाव होते. दिवंगत कांबळे यांची अंत्ययात्रा ६ फेब्रुवारी रोजी दुपारी ४.३० वाजता त्यांच्या गोविंदनगर प्लॉट नंबर ५ (स्टेट बँक, जयप्रकाशनगर शाखेसमोर) जयप्रकाशनगर खामला येथील निवासस्थानावरून निघेल. त्यांच्या पार्थिवावर सहकारनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.
नागपूरचे ज्येष्ठ पत्रकार हरीश कांबळे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 21:55 IST
ज्येष्ठ पत्रकार, इनफॉर्मेशन ब्युरो आॅफ इंडियाचे माजी संचालक तसेच आॅल इंडिया रेडिओचे माजी सहसंचालक हरीश शिवराम कांबळे यांचे सोमवारी दुपारी निधन झाले.
नागपूरचे ज्येष्ठ पत्रकार हरीश कांबळे यांचे निधन
ठळक मुद्देइनफॉर्मेशन ब्युरो आॅफ इंडियाचे माजी संचालक