शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

अयोध्येत रामललाच्या चरणी निनादणार नागपुरातील ‘रामधुन’, १११ वादक करणार अनोखी रामसेवा

By योगेश पांडे | Updated: January 8, 2024 21:29 IST

श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाकडून शहरातील शिवगर्जना ढोल पथकाकडून निमंत्रण आले असून दोन दिवस त्यांचा सादरीकरण राहणार आहे.

नागपूर : अयोध्येतील राममंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी जय्यत तयारी सुरू असताना नागपुरकरांचा उत्साहदेखील शिगेला पोहोचला आहे. विशेष म्हणजे संपूर्ण देश राममय होणार असताना अयोध्येतील रामललाच्या चरणी नागपुरातील ढोल-ताशा-ध्वज पथकातील ‘रामधुन’ निनादणार आहे. श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाकडून शहरातील शिवगर्जना ढोल पथकाकडून निमंत्रण आले असून दोन दिवस त्यांचा सादरीकरण राहणार आहे.

नागपुरात मागील काही वर्षांपासून ढोल-ताशा पथकांच्या वादनाची परंपरा सुरू झाली आहे. शहरातील अनेक तरुण-तरुणी याच्याशी जुळले आहेत. २२ जानेवारीसाठी गल्ली ते दिल्ली तयारी सुरू असताना अयोध्येतूनदेखील नागपुरातील ढोलपथकाची नोंद घेण्यात आली व प्रत्यक्ष मंदिर परिसरात सादरीकरणाची संधी देण्यात आली. प्राणप्रतिष्ठेनंतर २४ व २५ जानेवारी रोजी शिवगर्जना ढोल पथकातर्फे मंदिर तसेच हनुमानगढी येथे सादरीकरण करण्यात येणार आहे. पथकाकडून पारंपारिक धून तर सादर करण्यात येतीलच. मात्र अयोध्येत खास रामधुन व बजरंगबली धुन सादर करण्यावर त्यांचा भर राहणार आहे.

पोद्दारेश्वर राममंदिरातून सुरू होणार प्रवासशिवगर्जना पथकाचे प्रमुख प्रतिक टेटे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. शिवगर्जना ढोल-ताशा-ध्वज पथक अयोध्येत वादन करणार आहेत. आमचे पथक ४०-५० ढोल, २०-५ ताशे, २१ ध्वज व १० झांज घेऊन रामचरणी पोहोचले. आमच्या पथकात १११ वादक तरुण-तरुणी आहेत. आम्ही बसने अयोध्येत पोहोचू. आमचा प्रवास आम्ही शहरातील पोद्दारेश्वर राममंदिरात पूजा करून सुरू करू. संपूर्ण जगाच्या नजरा अयोध्येकडे लागल्या आहेत. आम्हाला रामलल्लानेच बोलविले असून आम्ही भाग्यवानच आहोत, अशी भावना टेटे यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्राच्या परंपरेचे रामनगरीत सादरीकरणया पथकाशी शहरातील शेकडो तरुण-तरुणी जुळले आहेत. आपापली कामे, अभ्यास इत्यादी बाबी सांभाळून नियमितपणे ते सराव करतात. शहर व देशाच्या विविध भागातील अनेक कार्यक्रमांत त्यांनी सादरीकरण केले आहे. या संधीच्या निमित्ताने अयोध्येत महाराष्ट्राच्या परंपरेचे वादन निनादणार आहे.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याnagpurनागपूर