शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या ‘एलआयटी’ला ‘डीम्ड’ विद्यापीठाचा दर्जा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 11:56 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे संचालित व देशातील नामांकित रासायनिक अभियांत्रिकी संस्था असलेल्या ‘एलआयटी’ला (लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी) ‘डीम्ड’ विद्यापीठाचा दर्जा मिळावा यासाठी केंद्रीय पातळीहून हालचाली सुरू झाल्या आहेत.

ठळक मुद्देकेंद्रीय पातळीवरून हालचाली सुरू कुलगुरूंनी घेतली मनुष्यबळ विकास मंत्रालयातील अधिकाऱ्यांची भेट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे संचालित व देशातील नामांकित रासायनिक अभियांत्रिकी संस्था असलेल्या ‘एलआयटी’ला (लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी) ‘डीम्ड’ विद्यापीठाचा दर्जा मिळावा यासाठी केंद्रीय पातळीहून हालचाली सुरू झाल्या आहेत. कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांना गुरुवारी यासंदर्भात चर्चेसाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे नवी दिल्ली येथे बोलविण्यात आले होते.केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या निर्देशांवरुन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कुलगुरूंशी चर्चा केली व या प्रस्तावासंदर्भात सकारात्मकता दर्शविली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नालॉजी ही नागपुरातील जुन्या अभियांत्रिकी संस्थांपैकी एक आहे. आॅगस्ट २०१६ मध्ये या संस्थेच्या स्थापनेला ७५ वर्षे पूर्ण झाली. मुंबईचे आयसीटी,व्हीजेटीआय, पुण्याचे कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग, नांदेडचे एसजेजीएस, कराड तसेच अमरावतीचे अभियांत्रिकी महाविद्यालये यांना स्वायत्तता मिळाल्यानंतर त्यांचा चेहरामोहरा बदलला. त्यामुळे ‘एलआयटी’ला स्वायत्तता मिळावी अशी मागणी शिक्षणक्षेत्रातून होत आहे. मात्र प्रत्यक्षात ‘एलआयटी’मध्ये प्राध्यापकांची सुमारे ३२ पदे रिक्त आहेत. शिवाय सर्व विभागांचे ‘एनबीए’ मूल्यमापनदेखील झालेले नाही. अशा स्थितीत स्वायत्तता मिळणे अडचणीचे जाणार आहे.त्यामुळे ‘एलआयटी’च्या विकासासाठी याला ‘डीम्ड’ विद्यापीठाचा दर्जा देण्याचा विचार समोर आला होता. याबाबतीत केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशीदेखील कुलुगुरुंची अगोदरदेखील चर्चा झाली होती.कुलगुरू व मनुष्यबळ विकास मंत्रालयातील अधिकाऱ्यांची ‘एलआयटी’संदर्भात सखोल चर्चा झाली. सोबतच यासंदर्भात नेमक्या कुठल्या तांत्रिक मुद्यांची पूर्तता करणेदेखील आवश्यक असेल यावरदेखील बोलणे झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान कुलगुरुंशी प्रतिक्रियेसाठी संपर्क होऊ शकला नाही.

तर ‘एलआयटी’चा होईल कायापालटजर ‘एलआयटी’ला ‘डीम्ड युनिव्हर्सिटी’चा दर्जा मिळाला तर संस्थेला मोठ्या प्रमाणावर फायदा होऊ शकेल. संस्थेच्या विकासासाठी २०० कोटींचा निधी प्राप्त होऊ शकतो व या माध्यमातून संस्थेचा पूर्णपणे कायापालट शक्य होऊन तेथे जागतिक सुविधा निर्माण केल्या जाऊ शकतात. सोबतच रिक्त पदांची समस्यादेखील दूर होईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे दर्जेदार संशोधनाला चालना मिळेल.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र