नागपूरच्या हार्ट ऑफ सिटी बंद, 1 वाजतपासून गोवारी समाजाने रस्ता धरला अडवून
By मंगेश व्यवहारे | Updated: February 5, 2024 16:27 IST2024-02-05T16:26:13+5:302024-02-05T16:27:01+5:30
सोमवारी विदर्भातून 50 हजाराच्या जवळपास आदिवासी बांधव संविधान चौकात पोहोचले.

नागपूरच्या हार्ट ऑफ सिटी बंद, 1 वाजतपासून गोवारी समाजाने रस्ता धरला अडवून
नागपूर : गोवारी समाजाला आदिवासींचे आरक्षण द्यावे, या मागणीसाठी 11 दिवसापासून समाजाचे 3 तरुण आमरण उपोषणावर बसले आहे. सरकारची उपोषना संदर्भात कुठलीही हालचाल नसल्याने, सोमवारी विदर्भातून 50 हजाराच्या जवळपास आदिवासी बांधव संविधान चौकात पोहोचले.
शहराचा महत्वाचा रस्ता असलेल्या संविधान चौकातून चारही बाजूची वाहतूक बंद केली. 1 वाजतापासून वाहतूक बंद असल्याने शहरातील वाहतूक व्यवस्था विस्कळित झाली आहे. उपोषण कर्त्यानी आता आश्वासन नको अध्यादेश आणा असे निर्णय घेतल्याने, पोलीस आणि प्रशासन त्यांना हाताळण्यास असक्षम ठरत आहे.