फक्त सोशल मीडियावर व्हायरल होत आहे नागपूरचे ‘छोटा गोवा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2023 09:00 IST2023-02-28T09:00:00+5:302023-02-28T09:00:02+5:30

Nagpur News नागपूरचा ‘छोटा गोवा’चा व्हिडीओ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे.

Nagpur's 'Chota Goa' is going viral only on social media. | फक्त सोशल मीडियावर व्हायरल होत आहे नागपूरचे ‘छोटा गोवा’

फक्त सोशल मीडियावर व्हायरल होत आहे नागपूरचे ‘छोटा गोवा’

ठळक मुद्देमासेमारी तलावाला फोटोग्राफीतून दाखविले गोव्यासारखे


फहीम खान

नागपूर : नागपूरचा ‘छोटा गोवा’चा व्हिडीओ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे. नागपूरपासून ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या पारशिवनी परिसरात असलेले हे ठिकाण गोव्यापेक्षा कमी नाही, असाही दावा केला जात आहे. मात्र, असे कुठलेही ठिकाण पारशिवनी परिसरात नाही.

मात्र, मे २०२२ मध्ये हा व्हिडीओ पहिल्यांदा पोस्ट झाल्यानंतर आता नागपुरातील ब्लॉगर हा व्हिडीओ अपलोड करून या ठिकाणाची गोव्याशी तुलना करण्यात मग्न आहेत. ज्याला गोव्याचा समुद्र दाखविण्याचा प्रयत्न होत आहे तो पारशिवनी परिसरातील एक लहान तलाव आहे. त्यात मासेमारी चालते. मच्छीमारांच्या बोटी काठावर लागलेल्या असतात. तलावाचा परिसर नैसर्गिक सौंदर्याने नटलेला आहे. मात्र, परिसरात घाण व दुर्गंधीमुळे कुणी येथे जास्त वेळ उभे राहू शकत नाही. गावकऱ्यांना सोशल मीडियावरील चर्चेची काहीच माहिती नाही. मात्र, ब्लॉगर या भागात गर्दी करीत असल्याने ते ही आश्चर्यचकित झाले आहेत.

Web Title: Nagpur's 'Chota Goa' is going viral only on social media.