शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

नागपूरकरांची कच्च्या घाणीच्या तेलाला पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:06 IST

नागपूर : कोरोना संसर्गामुळे अनेकांनी आपल्या जीवनशैलीत बदल केला आहे. रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आहाराकडे विशेष लक्ष दिले जात आहे. ...

नागपूर : कोरोना संसर्गामुळे अनेकांनी आपल्या जीवनशैलीत बदल केला आहे. रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आहाराकडे विशेष लक्ष दिले जात आहे. तेलाच्या बाबतीत जर-तरच्या प्रश्नावर तोडगा काढत रिफाईंड तेलाच्या जागी लाकडी, कच्चे घाणीचे म्हणजे, कोल्ड प्रेसचे तेलाचा वापर करण्याचे प्रमाण वाढले आहे. या तेलात रसायनांचा व अग्नीचा वापर होत नसल्याने गुणकारी असल्याचे आहारतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

तेल हा स्वयंपाकातील महत्त्वाचा घटक. पण आरोग्याचा विचार करता तेल अतिप्रमाणात खाणे, चुकीच्या पद्धतीने स्वयंपाकासाठी तेल वापरणे या सगळ्याच गोष्टी अपायकारक ठरतात. नागपुरात साधारण २० ते ३० वर्षांपूर्वी घाणीवरूनच तेल आणले जायचे. दरम्यानच्या काळात विविध कंपन्यांचे रिफार्ईंड तेल बाजारात आले. ते स्वस्त असल्याने घाणीच्या तेलाची मागणी घटली. परिणामी, अनेक घाण्या बंद पडल्या. सध्या कोरोनामुळे बहुसंख्य जनता ‘हेल्थ कॉन्शस’ झाली आहे. तेलाकडेही बारकाईने पाहत आहे. यामुळेच की काय, कच्चा घाणीच्या तेलाचा व्यवसाय नागपुरात जोरात सुरू आहे.

-काय आहे, कोल्ड प्रेसचे तेल

कोल्ड प्रेसचे तेलामध्ये तेलबिया निवडून स्वच्छ व आरोग्यदायी वातावरणात त्या लाकडी घाण्यावर दळल्या जातात. यात तेलबियांवर कुठलीही रासायनिक प्रक्रिया किंवा रसायनांचा वापर केला जात नाही. या प्रक्रियेत अग्नीचाही वापर होत नाही. कोल्ड प्रेसच्या पद्धतीने त्याचे उत्पादन होते. अन्य प्रक्रियायुक्त तेल अनेक वेळा उष्ण होण्याचा प्रक्रियेतून गेले असते. यामुळे त्याचा गंध आणि चव काहीशी नाहीशी होते. परंतु कोल्ड प्रेसच्या तेलात आपण ज्या तेलबियांचे तेल काढतो त्यांचा गंध आणि चव कायम राहते.

-रसायनांचा वापर नसलेले तेल आरोग्यासाठी चांगले

आहार तज्ज्ञ मालविका फुलवानी या म्हणाल्या, आहारातून ‘ट्रान्स फॅटी अ‍ॅसिड्स’ पुरेसे मिळत असल्याने तेलाचा कमीत कमी वापर करायला हवा. लठ्ठपणा, हृदयरोग, पक्षाघाताच्या रुग्णांनी खाण्यात तेलाचे सेवन सर्वात कमी करायला हवे. रसायनांचा वापर नसलेले तेल आरोग्यासाठी कधीही चांगले. यामुळेच लाकडी, कच्च्या घाणीचे तेल गुणकारी म्हणून पाहिले जात आहे. वास्तविक पाहता मोहरीचे तेल, सूर्यफुलाचे तेल किंवा खोबरेल तेल अधिक गुणकारी आणि कमी सॅच्युरेटेड फॅट्स असणारे आहे. जोखीम आणि फायद्याची बाब म्हणजे शेंगदाणा तेल हे मधल्या श्रेणीत येते.

कच्च्या घाणीच्या तेलाच्या मागणीत हळूहळू वाढ होताना दिसून येत आहे. कोरोनाचा पार्श्वभूमीवर आरोग्याच्या दृष्टिकोनातून लोक या तेलाकडे पुन्हा वळायला लागले आहेत. हे तेल ब्रॅण्डेड तेलाच्या तुलनेत महाग आहे. परंतु यात रसायनांचा वापर होत नसल्याने व आरोग्यदायी वातावरणत ते काढले जात असल्याने आरोग्यदायी म्हणूनही पाहिले जात आहे.

-अमिकेत तराळे

कच्च्या घाणीचे व्यावसायिक