अधिवेशनासाठी नागपूर जि.प.चे ५५ कर्मचारी आणि वाहनेही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 09:22 PM2019-12-13T21:22:18+5:302019-12-13T21:24:23+5:30

नागपूर जिल्हा परिषदेनेही प्रशासकीय कामकाजासाठी अधिनस्थ ५५ अधिकारी व कर्मचारी विधिमंडळाच्या कामकाजाला दिले आहे़ यासोबत, मौदा, रामटेक आणि कुही येथील खंडविकास अधिकाऱ्यांची वाहनेही सेवेला आहे़

Nagpur ZP staff and vehicles for the session | अधिवेशनासाठी नागपूर जि.प.चे ५५ कर्मचारी आणि वाहनेही

अधिवेशनासाठी नागपूर जि.प.चे ५५ कर्मचारी आणि वाहनेही

Next

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर: राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन १६ डिसेंबरपासून नागपुरात होत आहे़ येथे येणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची कुठेही गैरसोय होऊ नये म्हणून विविध सरकारी विभागांकडून कर्मचाऱ्यांसह वाहने मागविण्यात येतात़ नागपूर जिल्हा परिषदेनेही प्रशासकीय कामकाजासाठी अधिनस्थ ५५ अधिकारी व कर्मचारी विधिमंडळाच्या कामकाजाला दिले आहे़ यासोबत, मौदा, रामटेक आणि कुही येथील खंडविकास अधिकाऱ्यांची वाहनेही सेवेला आहे़
यामध्ये २५ शिपाई, वरिष्ठ लिपिक १५ व प्रधान सचिव, उपसचिव, अवर सचिवांचे संपर्क अधिकारी म्हणून १३ अधिकारी कर्तव्याला हजर राहणार आहे़ यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग आणि लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता व काही सहायक बीडीओंचा समावेश आहे़ दरवर्षी जिल्हा परिषद हे मनुष्यबळ विधिमंडळाच्या कामकाजातील सहकार्याचा भाग म्हणून पुरविते़ दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा व बांधकाम विभागाला स्वत:ची वाहने नाही़ कंत्राटी तत्त्वावर वाहने घेऊन आपला कारभार हाकावा लागतो़ तरीही मोठेपण करीत जिल्हा परिषदेने ही वाहने शासनाला कामकाजासाठी दिली आहे़ जवळपास २० ते २५ वाहने जिल्हा परिषदेला हवी आहे, ही मिळाल्यास शासनाच्या कामातच ती उपयोगात येईल, असेही म्हणणे जिल्हा परिषदेच्या बड्या अधिकाऱ्यांचे आहे़

Web Title: Nagpur ZP staff and vehicles for the session

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.