शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात हायव्हॉल्टेज ड्रामा! देशात राजकीय खळबळ; फिल्ड मार्शल मुनीर बनणार राष्ट्रपती?
2
Khuldabad Rename: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलदाबादचे नाव बदलून रत्नापूर करण्याची मागणी!
3
"मी मुलीशिवाय जगू शकणार नाही..."; लेकीने आयुष्य संपवल्यावर आईनेही मृत्यूला कवटाळलं
4
भारीच! एक रिल बनवा अन् १५ हजार जिंका, सरकारकडून पैसे मिळवा; जाणून घ्या सविस्तर
5
राहुल गांधींविरोधात किती खटले? किती प्रकरणांमध्ये मिळालाय जामीन? जाणून घ्या...
6
"हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडलाय"; राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडले?
7
चीनच्या मिसाईलमुळे भारतानं S-400 एअर डिफेन्स सिस्टिम गमावली? समोर आलं धक्कादायक सत्य
8
"प्रत्येक सीननंतर सांगितलं किस करायला...", 'अक्सर२'मध्ये फसवून केलेलं अश्लील शूट, जरीनचा धक्कादायक खुलासा
9
सहा वर्षांच्या लेकीला मारलं अन् घरातच कुजत ठेवला मृतदेह! आईच इतकी क्रूर का झाली?
10
"मंत्री माझ्या वडिलांच्या पाया पडतात, तू..."; भाजपा नेत्याच्या मुलाची धमकी, महिलने संपवलं जीवन
11
"तुम्ही भारताचे पंतप्रधान असाल किंवा चीनचे राष्ट्राध्यक्ष, पण जर तुम्ही..."; नाटोच्या प्रमुखांची तीन देशांना थेट धमकी
12
हृदयद्रावक! लेकीच्या साखरपुड्याआधी वडिलांना मृत्यूने गाठलं, २० सेकंदात ३ ट्रकने चिरडलं
13
मनसे नेते प्रकाश महाजनांना अमित ठाकरे, बाळा नांदगावकरांचा फोन; नाराजी दूर करण्याचा प्रयत्न
14
नशिबाचा खेळ! ३३ वर्षांपूर्वी मुलासाठी ढाबा बांधत होते, तिथेच मुलाचा मृत्यू झालेला, त्याच ढाब्यासमोर फौजा सिंग यांना कारने उडवले
15
लग्न खरं नाही, पण मजा १००% खरी! दिल्ली-पुण्यात सुरु झालाय 'फेक वेडिंग'चा नवा ट्रेंड, तरुणाई करतेय लाखो खर्च
16
Mumbai: सोसायटीच्या दहाव्या मजल्यावरून पडून अभियंत्याचा मृत्यू, मालाड पश्चिम येथील घटना
17
अपडेट झालं नाही तर बंद होईल मुलांचं आधार कार्ड; UIDAI नं नियमांमध्ये केला मोठा बदल
18
Vastu Tips: श्रीमंतांचं घर जणू आरसेमहल; कारण आरसे योग्य दिशेला लावण्याने वाढते संपत्ती!
19
अशोक मामांना भेटली छोटी रमा! "त्यांनी भेट झाल्या झाल्या...", तेजश्री वालावलकरची पोस्ट
20
बायकोने रचला हत्येचा कट, मित्र अन् बॉयफ्रेंडने दिली साथ! नवऱ्याच्या कार अपघातामागचं सत्य ऐकून बसेल धक्का

नागपूर जि.प. सभापतींसाठी इच्छुकांची रस्सीखेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 21:28 IST

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीनंतर आता काँग्रेसपुढे सभापतींचे आव्हान उभे ठाकले आहे. काँग्रेसमध्ये इच्छुकांची संख्या जास्त आहे. त्यातच राष्ट्रवादीनेही दोन विषय समितीचे सभापती मागितले आहेत.

ठळक मुद्देकाँग्रेसपुढे आव्हान : राष्ट्रवादी दोन सभापतींच्या प्रतीक्षेत

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीनंतर आता काँग्रेसपुढे सभापतींचे आव्हान उभे ठाकले आहे. काँग्रेसमध्ये इच्छुकांची संख्या जास्त आहे. त्यातच राष्ट्रवादीनेही दोन विषय समितीचे सभापती मागितले आहेत. त्यामुळे काँग्रेस कुणाची नाराजी स्वीकारते हे बघणे महत्त्वाचे आहे.जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची निवड ही मंत्री सुनील केदार यांच्या गटातील सदस्यांची झाली आहे. पण जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, ज्येष्ठ नेते नाना गावंडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव सुरेश भोयर यांच्या गटाचे सदस्य अजूनही प्रतीक्षेत आहेत. तिकडे ज्येष्ठ सदस्यसुद्धा अपेक्षा ठेवून आहेत. काँग्रेसच्या ज्येष्ठ सदस्यांमध्ये शांता कुमरे, नाना कंभाले, शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेले तापेश्वर वैद्य, कैलास राऊत यांचा समावेश आहे. त्याचबरोबर काँग्रेसमध्ये निवडून आलेले काही विशेष सदस्यसुद्धा आहेत. यात मोठ्या मतांनी निवडून आलेल्या अवंतिका लेकुरवाळे, सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेल्या मुक्ता कोकड्डे यांचाही समावेश आहे. अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची निवड करताना सुनील केदार यांनी आडमुठेपणाची भूमिका घेतली होती. त्यामुळे राष्ट्रवादीनेही उपाध्यक्षासाठी अर्ज भरले होते. पण दोन सभापतींच्या प्रस्तावावर काँग्रेसने सकारात्मक भूमिका घेतल्याने राष्ट्रवादीने अर्ज मागे घेतले. जि.प.च्या दोन्ही मुख्य पदांवर निवड झालेले सदस्य हे सुनील केदार यांच्या गटाचे आहेत. त्यामुळे इतर नेत्यांच्या गटातील सदस्यांना सभापतिपद मिळतील, अशी अपेक्षा आहे. पण राष्ट्रवादीला दोन सभापतिपद दिल्यास काँग्रेसमध्येच नाराजीचा सूर उमटण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार काँग्रेस राष्ट्रवादीला एक सभापतिपद देण्याच्या मानसिकतेत आहे.दुसरीकडे राष्ट्रवादीने दोन सभापतीची मागणी केली आहे. राष्ट्रवादीमध्येही सभापती पदासाठी चंद्रशेखर कोल्हे, दिनेश बंग, उज्ज्वला बोढारे यांचे नाव चर्चेत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार राष्ट्रवादीला दोन पदे न मिळाल्यास राष्ट्रवादी वेगळा विचार करण्याच्या मानसिकतेत आहे.अपेक्षा अनेकांच्या नेत्यांची मर्जीतसे शंकर डडमल, दुधाराम सव्वालाखे, मेघा मानकर, योगेश देशमुख, शालिनी देशमुख यांनी भाजप-सेनेच्या गडाला खिंडार पाडून काँग्रेसचे अस्तित्व निर्माण केले आहे. त्यामुळे या सदस्यांनाही सन्मानाची अपेक्षा आहे. पण नेत्यांच्या मर्जीवर सर्वकाही अवलंबून आहे.

टॅग्स :Nagpur Z.P.जिल्हा परिषद नागपूरElectionनिवडणूकcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस