शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जि.प. :ओबीसी, खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मिळणार गणवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 20:13 IST

समग्र शिक्षा अभियानांतर्गत सर्व विद्यार्थिनी व एससी, एसटी, व्हीजेएनटी विद्यार्थ्यांना गणवेश दिला जातो. पण ओबीसी व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थी गणवेशापासून वंचित राहतात. गेल्या तीन ते चार वर्षापासून ओबीसी व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना गणवेश मिळावे अशी मागणी होत होती. यंदा जि.प.च्या शिक्षण सभापती यांनी अर्थसंकल्पात ओबीसी व खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी ४५ लाख रुपयांची तरतूद केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : समग्र शिक्षा अभियानांतर्गत सर्व विद्यार्थिनी व एससी, एसटी, व्हीजेएनटी विद्यार्थ्यांना गणवेश दिला जातो. पण ओबीसी व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थी गणवेशापासून वंचित राहतात. गेल्या तीन ते चार वर्षापासून ओबीसी व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना गणवेश मिळावे अशी मागणी होत होती. यंदा जि.प.च्या शिक्षण सभापती यांनी अर्थसंकल्पात ओबीसी व खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी ४५ लाख रुपयांची तरतूद केली आहे.कोरोनाचे संकट तसेच अवाजवी खर्चावर शासनाकडून निर्बंध घालण्यात आले असले तरी, जिल्हा परिषद पदाधिकारी व प्रशासनाने या सर्वांतून मार्ग काढत, विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी प्रथमच तब्बल ४५ लाखाची तरतूद केली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या १६ हजारावर विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार आहे. तसे जि.प.च्या ग्रामीण भागात १,५३६ शाळा आहेत. दिवसागणीक शाळांची पटसंख्या रोडावत चालली आहे. शाळांची पटसंख्या वाढण्यासाठी शासनामार्फत मोफत गणवेश योजना सुरू केली. यात इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण घेणाºया एससी, एसटी, बीपीएल प्रवर्गातील मुले व सर्व मुलींना गणवेशाचा लाभ दिल्या जातो. ओबीसी व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना गणवेश मिळत नसल्याने त्यांच्यात न्यूनगंड तयार होत होता. वर्ष २०१९-२० च्या जि.प. तत्कालीन वित्त व शिक्षण सभापती उकेश चव्हाण यांनी अर्थसंकल्पात नॉन बीपीएल/ओपन व ओबीसीच्या विद्यार्थ्यांना गणवेश/ टी शर्ट या हेडवर २० लाख रुपयांची तरतूद केली होती. मात्र, परंतु तो निधी खर्चच झाला नाही.यंदा कोरोनामुळे सरकारच्या तिजोरीवर परिणाम झाला आहे. जि.प.ला प्राप्त होणाऱ्या अनुदानामध्ये कपात होण्याची शक्यता आहे. जि.प.चा सेसफंडाचा अर्थसंकल्प मुख्यत्वे शासन स्रोतांवर अवलंबून असल्याने अर्थसंकल्पित खर्चावर मर्यादा आणण्याच्या सूचना कॅफोंनी केल्या आहेत. त्यामुळे यंदाही विद्यार्थी गणवेशापासून वंचित राहण्याची शक्यता होती. परंतु जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी विषयाला गांभीर्याने घेतले. या विषयाला मंजुरीसाठी स्थायी समितीच्या सभेत ठेवण्यात येणार आहे.गेल्या तीन ते चार वर्षापासून विद्यार्थ्यांना गणवेश मिळाला नव्हता. शिक्षण सभापती म्हणून विद्यार्थ्यांना प्राथमिकता देणे हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे यंदा कुठल्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांना गणवेश द्यायचा हे निश्चित केले होते. त्यासाठी ४५ लाखाची तरतूदही केली आहे. त्यामुळे यंदा निश्चितच गणवेश मिळेल.भारती पाटील, सभापती शिक्षण व वित्त, जि.प.

टॅग्स :SchoolशाळाNagpur Z.P.जिल्हा परिषद नागपूर