शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जि. प. निवडणूक : महाविकास आघाडीचा प्रयोग फसला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 20:29 IST

राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर जिल्ह्यातही महाविकास आघाडीच्या फार्मुल्यावर निवडणुका पार पडतील, अशी अपेक्षा होती. पण जिल्ह्यात महाविकास आघाडीचा प्रयोग काही जुळून आला नाही.

ठळक मुद्देशिवसेनेचे एकला चलो : काँग्रेस-राष्ट्रवादीने जमविला जुगाड, पण राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नाराज

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर जिल्ह्यातही महाविकास आघाडीच्या फार्मुल्यावर निवडणुका पार पडतील, अशी अपेक्षा होती. पण जिल्ह्यात महाविकास आघाडीचा प्रयोग काही जुळून आला नाही. काँग्रेस राष्ट्रवादीने आघाडीचा जुगाड जमविला, पण शिवसेनेला सोबत घेतले नाही. त्यामुळे शिवसेनेने एकला चलोचा नारा देत ५५ जागेवर उमेदवार उभे केले. पण काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीतही राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होत असताना गेल्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने ज्या जागा राखल्या होत्या. त्या जागेवर तेच पक्ष उमेदवार उभे करतील. मात्र इतर जागेवर समसमान वाटप करण्यात येईल. पण उमेदवारी देताना काँग्रेसने अपेक्षेपेक्षा जास्त उमेदवार पदरात पाडले. काँग्रेसने राष्ट्रवादीला ५८ पैकी १६ जागा दिल्या. पण त्यातही काँग्रेसने राष्ट्रवादीच्या काही जागेवर अतिक्रमण केल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला, ६ तालुक्यात राष्ट्रवादीचे अस्तित्व काँग्रेसने नाकारल्याची ओरड राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली. या नाराजीमुळे पदाधिकाऱ्यांकडून राजीनामेही पक्षाकडे पाठविण्यात आले. पण या प्रकारामुळे पक्षांमध्ये एक चुकीचा संदेश जात असल्याने नेत्यांनी नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढून राजीनामे स्वीकारले नाहीत.शिवसेनेने सुरुवातीला काँग्रेस-राष्ट्रवादीला साथ देण्याचा निर्णय घेतला होता. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीचाच फार्मुला जुळत नसल्याने सेनेने स्वतंत्र पाऊल उचलले आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सेनेने बहुतांश जागेवर उमेदवार उभे केले. राज्यात भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाला. पण स्थानिक स्वराज्य संस्थेने त्याला यश आले नाही. त्यामुळे जिल्ह्यात कुठे तिरंगी तर कुठे चौरंगी लढत रंगणार असल्याचे चित्र आहे. भाजपाने सर्वच सर्कलमध्ये आपले उमेदवार उभे केले असून, त्यांच्यातही काही प्रमाणात फाटाफूट झाली आहे. त्याचा फटका भाजपालाही बसणार असल्याचे चिन्हे आहेत.

टॅग्स :zpजिल्हा परिषदElectionनिवडणूकcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना