शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

नागपूर जिल्हा परिषद : पदाधिकाऱ्यांच्या नावाचे फलकही झाकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 11:21 PM

जिल्हा परिषदेने आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये म्हणून चांगलेच मनावर घेतले आहे. यापूर्वी आचारसंहिता लागूनही जि.प. चे फलक झाकले जात नव्हते. यावर्षी मात्र जि.प.ने पदाधिकाऱ्यांच्या नावांचे सर्वच फलक कागदाने झाकून ठेवत आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी केल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देआचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्हा परिषदेने आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये म्हणून चांगलेच मनावर घेतले आहे. यापूर्वी आचारसंहिता लागूनही जि.प. चे फलक झाकले जात नव्हते. यावर्षी मात्र जि.प.ने पदाधिकाऱ्यांच्या नावांचे सर्वच फलक कागदाने झाकून ठेवत आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी केल्याचे दिसून येत आहे.लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा होताच आचारसंहिता लागली. यावर्षीच्या निवडणुकीत पहिल्यांदाच आचारसंहितेची प्रशासनाकडून काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे चित्र आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर प्रशासनानेपदाधिकाऱ्यांची वाहने सरकारजमा केली. किंबहुना पदाधिकाऱ्यांनीच शासकीय वाहने प्रशासनाकडे आचारसंहितेनंतर जमा केली. यापूवीर्ही लोकसभा, विधानसभा, जि.प. निवडणुकीची आचारसंहिता लागली तेव्हा जिल्हा परिषदेमधील पदाधिकाऱ्यांच्या नावाचे फलक पेपरने झाकले नव्हते. मात्र, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जि.प. ने चांगलीच मनावर घेतल्याचे दिसून येत आहे. आचारसंहिता लागताच प्रशासनाने जि.प.मधील पदाधिकाऱ्यांच्या नावांचे अनेक फलक कागदाने चिकटवून, झाकून ठेवले आहे. कागदाने झाकलेली फलके पाहून ‘जि.प.मध्ये यापूर्वी एवढी काटेकोरपणे आचारसंहिता पाहिली नाही’ असे आश्चर्यकारक उद्गार पदाधिकाऱ्यांसह अनेकांच्या तोंडातून निघत आहे. आचारसंहितेच्या कालावधीत कुठल्याही प्रकारच्या विकास कामांना मान्यता देणे अथवा त्याचे उद्घाटन करणे याला मनाई असल्याने पदाधिकाऱ्यांनी जि.प.कडे पाठ फिरविली आहे. जि.प.चे पदाधिकारी विविध भागात राहतात. लांब अंतरावरून खासगी वाहनावर खर्च करणे त्यांना पेलणारा नाही. त्यामुळे जि.प.मध्ये येणे ते टाळत आहेत. आचारसंहिता संपेपर्यंत विकास कामांच्या उद्घाटनाला ब्रेक लागल्याने जि.प.तील प्रमुख अधिकारी निवडणुकीच्या कामासाठी गुंतले आहेत, तर पदाधिकारी व सदस्यांनी जि.प.कडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNagpur Z.P.जिल्हा परिषद नागपूर