In Nagpur, a young woman's mobile phone was snatched | नागपुरात तरुणीला मारून मोबाईल हिसकावून नेला

नागपुरात तरुणीला मारून मोबाईल हिसकावून नेला

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : औषध घ्यायला निघालेल्या तरुणीच्या गालावर थापड मारून दुचाकीवरील तीन भामट्यांनी तिचा मोबाईल हिसकावून नेला. नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी दुपारी ४ च्या सुमारास ही घटना घडली. ज्योती रामस्वरूप बांगडी (वय ३४) असे फिर्यादी तरुणीचे नाव असून त्या हिवरी नगरात राहतात. शुक्रवारी दुपारी ४ च्या सुमारास ज्योती नंदनवन मधील भीम चौक ते हिवरीनगर रस्त्याने जात होत्या. दुचाकीवर आलेल्या तीन आरोपींनी ऑटो स्टॅन्ड जवळ त्यांच्या गालावर थापड मारली आणि त्यांच्या हातातील आठ हजार रुपयांचा मोबाईल हिसकाऊन नेला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे ज्योती गोंधळल्या. त्यांनी मदतीसाठी आरडाओरड केली. मात्र तोपर्यंत आरोपी पळून गेले होते. ज्योती बांगडी यांनी दिलेल्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेतला जात आहे.

वाढत्या घटनांमुळे चिंता

शहरात लुटमारीच्या घटना वाढत आहेत. दोन दिवसापूर्वी पारडी आणि अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मारहाण करून लुटण्याच्या घटना घडल्या. या आठवड्यात अशा प्रकारच्या अनेक घटना घडल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांत चिंता व्यक्त केली जात आहे

Web Title: In Nagpur, a young woman's mobile phone was snatched

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.