नागपूर हिवाळी अधिवेशन २०१९; वारकरी संप्रदायाने नाना पटोले यांचे केले अनोखे स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 18:35 IST2019-12-16T18:34:41+5:302019-12-16T18:35:09+5:30
हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी वारकरी सांप्रदायच्या लोकांनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचे त्यांच्या कक्षात पगडी घालून स्वागत केले.

नागपूर हिवाळी अधिवेशन २०१९; वारकरी संप्रदायाने नाना पटोले यांचे केले अनोखे स्वागत
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी वारकरी सांप्रदायच्या लोकांनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचे त्यांच्या कक्षात पगडी घालून स्वागत केले. सोमवारी सकाळी या मंडळीनी नाना पटोले यांची त्यांच्या कक्षात जाऊन सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी पटोले यांना संप्रदायाची पगडी व उपरणे परिधान करावयास दिले. पटोले यांनीही मोठ्या श्रद्धाभावनेने त्याचा स्वीकार करीत ते धारण केले. विशेष म्हणजे पुढील दिवसभराचे कामकाज पटोले यांनी याच वेषात पूर्ण केले.