नागपूर हिवाळी अधिवेशन २०१९; सिंचन घोटाळ्याचे वास्तव बाहेर आले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 18:11 IST2019-12-20T18:10:53+5:302019-12-20T18:11:24+5:30
अजितदादांसारख्या बहुजन आणि मराठा समाजाच्या एका नेत्याला यात अडकवून मतांचे राजकारण करण्यासाठी हे करण्यात आले होते. ते या निमित्ताने सिद्ध झाल्याचे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधीमंडळ परिसरात बोलताना म्हटले.

नागपूर हिवाळी अधिवेशन २०१९; सिंचन घोटाळ्याचे वास्तव बाहेर आले
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: सिंचन घोटाळ्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करत अजित पवार यांना क्लीन चीट दिली आहे. मुळात वैयक्तिक राजकारण करून एखाद्याचे चारित्र्यहनन करण्याची भाजपची परंपरा आहे. केंद्रात सरकार आल्यावरही अशी कामे भाजपच्या वतीने करण्यात आली. यात काय झाले ते पूर्ण देशाने पाहिले. ७० हजार कोटींचा सिंचन घोटाळा हा शब्द भाजपने केवळ मतांच्या राजकारणासाठी पुढे केला. आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या प्रतिज्ञापत्रात अजित पवार यांचा या घोटाळ्याशी काहीएक संबंध नसल्याचे सिद्ध झाले आहे. मुळात अजितदादांसारख्या बहुजन आणि मराठा समाजाच्या एका नेत्याला यात अडकवून मतांचे राजकारण करण्यासाठी हे करण्यात आले होते. ते या निमित्ताने सिद्ध झाल्याचे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधीमंडळ परिसरात बोलताना म्हटले.