नागपूर हिवाळी अधिवेशन २०१९; महिलांच्या सुरक्षिततेकरिता सरकार कटिबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 04:51 PM2019-12-18T16:51:39+5:302019-12-18T16:52:19+5:30

हैदराबादच्या धर्तीवर महाराष्ट्रातही महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कडक कायदा तयार करण्यात येत आहे, त्याचा मसुदा तयार केला जात आहे अशी माहिती राज्याचे गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिवाळी अधिवेशनात दिली.

Nagpur Winter Session 19; Government is committed to the safety of women | नागपूर हिवाळी अधिवेशन २०१९; महिलांच्या सुरक्षिततेकरिता सरकार कटिबद्ध

नागपूर हिवाळी अधिवेशन २०१९; महिलांच्या सुरक्षिततेकरिता सरकार कटिबद्ध

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: हैदराबादच्या धर्तीवर महाराष्ट्रातही महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कडक कायदा तयार करण्यात येत आहे, त्याचा मसुदा तयार केला जात आहे अशी माहिती राज्याचे गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिवाळी अधिवेशनात दिली. विधानभवन परिसरात प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना त्यांनी, महिलांच्या सुरक्षितेतला सर्वोच्च प्राधान्य दिले जाणार असल्याचे सांगून,यासंदर्भात लवकरच कठोर उपाययोजना राबविण्यात येणार असल्याचे म्हटले. राज्यातील महिलांना सुरक्षित वाटले पाहिजे, त्यांना निर्भयपणे वावरता आले पाहिजे यासाठी शासन कटिबद्ध आहे. त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल व त्यासंदर्भातील पावले उचलली जात आहेत अशी माहिती दिली.
नागपूरचे महापौर संदीप जोशी यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत प्रतिक्रिया देताना त्यांनी, अधिवेशन काळात अशी घटना घडावी हे दुर्दैव आहे. आम्ही त्याची पूर्ण चौकशी करू व दोषींना शिक्षा होईल असे आश्वासन दिले.

Web Title: Nagpur Winter Session 19; Government is committed to the safety of women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.