नागपूर हिवाळी अधिवेशन २०१९; ३१ डिसेंबरपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 10:37 IST2019-12-21T10:36:32+5:302019-12-21T10:37:06+5:30
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठरवलं तर येत्या ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला असेल असे वक्तव्य अजित पवार यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना, अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी केले.

नागपूर हिवाळी अधिवेशन २०१९; ३१ डिसेंबरपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठरवलं तर येत्या ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला असेल असे वक्तव्य अजित पवार यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना, अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी केले.
मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत त्यांच्याकडे विचारणा केली असता, येत्या वर्षाअखेरपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार घोषित होण्याची शक्यता त्यांनी वर्तविली. या मंत्रिमंडळात आपण मंत्री असणार का या प्रश्नाच्या उत्तरादाखल त्यांनी, आमच्या पक्षाचे कोण मंत्री असतील याबाबत शरद पवारसाहेब योग्य तो निर्णय घेतील असे म्हटले.