शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
2
सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
3
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
4
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
5
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
6
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
7
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
8
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
9
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
10
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
11
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
12
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
13
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
14
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
15
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
16
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
17
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
18
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

नागपुरात लवकरच महिलांसाठी ‘इलेक्ट्रिक बस’ येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 9:50 AM

राज्य सरकारच्या तेजस्विनी योजनेंतर्गत नागपूर महापालिकेतर्फे चालविण्यात येणाऱ्या ‘आपली बस’च्या ताफ्यामध्ये खास महिलांसाठी लवकरच ‘इलेक्ट्रिक बस’ दाखल होणार आहे.

ठळक मुद्दे‘तेजस्विनी’अंतर्गत सहा बसची होणार खरेदीवाहक व चालकही महिलाच

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य सरकारच्या तेजस्विनी योजनेंतर्गत नागपूर महापालिकेतर्फे चालविण्यात येणाऱ्या ‘आपली बस’च्या ताफ्यामध्ये खास महिलांसाठी लवकरच ‘इलेक्ट्रिक बस’ दाखल होणार आहे. याअंतर्गत सहा इलेक्ट्रिक बसची खरेदी होणार असून महिलांच्याच हस्ते या बसचे लोकार्पण होणार आहे. महापालिकेच्या मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात शुक्रवारी परिवहन समितीची बैठक झाली. ती यासंदर्भातील विषयाला मंजुरी देण्यात आली. यासंदर्भात बैठकीत अधिक माहिती देताना समितीचे सभापती बंटी कुकडे म्हणाले, ‘आपली बस’च्या ताफ्यात दाखल होणाऱ्या या सर्व इलेक्ट्रिक बसेस महिलांना समर्पित राहील. या बसेस महिला सुरक्षेच्या दृष्टीने परिपूर्ण असतील. महिलांसाठी आवश्यक सर्व सोयी त्यात असतील. या बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे राहणार असून ते पूर्ण वेळ कार्यान्वित असतील. महिला विशेष बसमधील वाहकही महिलाच राहणार असून बसच्या चालकही महिलाच राहतील, यादृष्टीने आपले प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.या बसमुळे मनपाच्या परिवहन विभागाचा आर्थिक तोटा कमी करण्यास मदत होणार आहे. कारण या बस पूर्णपणे इलेक्ट्रिक चार्जिंगवर चालणार आहेत. त्यामुळे डिझेलच्या खर्चाची बचत होणार आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाची मोहोर उमटविणाऱ्या महिला, गरीब होतकरू विद्यार्थिनी यांच्या हस्ते या बसेसचे लोकार्पण करण्यात येणार असल्याची माहिती सभापती बंटी कुकडे यांनी यावेळी दिली.बैठकीला समितीचे उपसभापती प्रवीण भिसीकर, सदस्य अभिरूची राजगिरे, अर्चना पाठक, उज्ज्वला शर्मा, मनिषा धावडे, विद्या मडावी, नरेंद्र वालदे, नितीन साठवणे, वैशाली रोहणकर, कल्पना कुंभलकर, परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप, प्रशासकीय अधिकारी रवींद्र पागे, श्रम अधिकारी अरुण पिपरुडे, लेखाधिकारी विनय भारद्वाज, वाहतूक व्यवस्थापक सुकीर सोनटक्के, अतांत्रिक पर्यवेक्षक रामराव मातकर उपस्थित होते.नगरसेवक तपासणार बस तिकीटसध्या शहरातील रस्त्यांवर ‘आपली बस’च्या ३७० बस धावत आहेत. मात्र, महापालिकेच्या लेखी प्रवासी वाढलेले नाहीत व उत्पन्नातही वाढ झालेली नाही. दररोज तोट्यात वाढ होत आहे. त्यामुळे आता तिकिटांपासून येणारी कमाई वाढविण्यालाठी व बस फेऱ्यांची अनियमितता रोखण्यासाटी परिवहन विभागाने एक नवा फॉर्म्युला तयार केला आहे. परिवहन समितीचे सदस्य असलेल्या नगरसेवकांना विभाग व समितीच्या सहकार्याने ओळखपत्र दिले जात आहे. या ओळखपत्राच्या आधारे ते शहरातील कोणत्याही मार्गावर कोणत्याही बसमध्ये तिकिटांचा व प्रवाशांचा हिशेब घेऊ शकतील. परिवहन व्यवस्थेवर लक्ष ठेवण्यासाठी आयबीटीएम आॅपरेटर डिम्ट्सची नियुक्ती करण्यात आली. मात्र, त्यांच्याकडे फक्त ४८ चेकर आहेत. दररोज ३७० बसच्या ४८१२ फेऱ्या होतात. आधीच कर्मचाऱ्यांच्या हातमिळवणीतून लाखो रुपयांचा कॅशकार्ड घोटाळा झाला आहे. ३५ वाहकांवरही कारवाई करण्यात आली आहे. विभागातर्फे भरारी पथके नेमण्यात आली आहेत. मात्र, त्याचाही फायदा होताना दिसत नाही. त्यामुळे आता सदस्यांनाच तिकीट तपासणीसाठी मैदानात उतरविले जाणार आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका