शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
3
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
4
"मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
5
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
6
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
7
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
8
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
9
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
10
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
11
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
12
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
13
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
14
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
15
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
16
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
17
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
18
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
19
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
20
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद

नागपूर विद्यापीठ : सरन्यायाधीश शरद बोबडे यांना मानद ‘डी.लिट.’ द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2020 10:12 PM

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने मानद ‘डी.लिट.’ पदवी प्रदान करावी, अशी मागणी प्राधिकरण सदस्यांकडून करण्यात आली आहे. यासंदर्भात शुक्रवारी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत प्रस्ताव मांडण्यात आला व सर्वच सदस्यांनी त्याला समर्थन दिले.

ठळक मुद्देव्यवस्थापन परिषदेत सदस्यांकडून प्रस्ताव

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने मानद ‘डी.लिट.’ पदवी प्रदान करावी, अशी मागणी प्राधिकरण सदस्यांकडून करण्यात आली आहे. यासंदर्भात शुक्रवारी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत प्रस्ताव मांडण्यात आला व सर्वच सदस्यांनी त्याला समर्थन दिले.नागपूरचे सुपुत्र असलेल्या सरन्यायाधीशांना मानद ‘डी.लिट.’ देण्यात यावी अशी मागणी बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र अ‍ॅन्ड गोवाचे सदस्य अ‍ॅड.पारिजात पांडे तसेच विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य विष्णू चांगदे यांनी केली होती. यासंदर्भात ९ मार्च रोजी विद्यापीठाला पत्रदेखील पाठविले होते. याचा आधार घेत चांगदे यांनी व्यवस्थापन परिषदेसमोर संबंधित प्रस्ताव ठेवला. कुलगुरूंनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यातील तरतुदींनुसार प्रक्रिया पूर्ण करावी व त्यासंदर्भात घोषणा करावी, असा प्रस्ताव होता. सर्व सदस्यांनी एकमताने या प्रस्तावाचे समर्थन केले. सरन्यायाधीशांना मानद ‘डी.लिट.’ प्रदान करण्यात आली तर तो नागपूर विद्यापीठाचाच सन्मान ठरेल, अशी भावना सदस्यांनी मांडली

टॅग्स :Sharad Arvind Bobdeशरद बोबडेRashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ