लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने मानद ‘डी.लिट.’ पदवी प्रदान करावी, अशी मागणी प्राधिकरण सदस्यांकडून करण्यात आली आहे. यासंदर्भात शुक्रवारी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत प्रस्ताव मांडण्यात आला व सर्वच सदस्यांनी त्याला समर्थन दिले.नागपूरचे सुपुत्र असलेल्या सरन्यायाधीशांना मानद ‘डी.लिट.’ देण्यात यावी अशी मागणी बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र अॅन्ड गोवाचे सदस्य अॅड.पारिजात पांडे तसेच विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य विष्णू चांगदे यांनी केली होती. यासंदर्भात ९ मार्च रोजी विद्यापीठाला पत्रदेखील पाठविले होते. याचा आधार घेत चांगदे यांनी व्यवस्थापन परिषदेसमोर संबंधित प्रस्ताव ठेवला. कुलगुरूंनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यातील तरतुदींनुसार प्रक्रिया पूर्ण करावी व त्यासंदर्भात घोषणा करावी, असा प्रस्ताव होता. सर्व सदस्यांनी एकमताने या प्रस्तावाचे समर्थन केले. सरन्यायाधीशांना मानद ‘डी.लिट.’ प्रदान करण्यात आली तर तो नागपूर विद्यापीठाचाच सन्मान ठरेल, अशी भावना सदस्यांनी मांडली
नागपूर विद्यापीठ : सरन्यायाधीश शरद बोबडे यांना मानद ‘डी.लिट.’ द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 22:13 IST
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने मानद ‘डी.लिट.’ पदवी प्रदान करावी, अशी मागणी प्राधिकरण सदस्यांकडून करण्यात आली आहे. यासंदर्भात शुक्रवारी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत प्रस्ताव मांडण्यात आला व सर्वच सदस्यांनी त्याला समर्थन दिले.
नागपूर विद्यापीठ : सरन्यायाधीश शरद बोबडे यांना मानद ‘डी.लिट.’ द्या
ठळक मुद्देव्यवस्थापन परिषदेत सदस्यांकडून प्रस्ताव