नागपूर विद्यापीठ : सत्र सुरू होऊनदेखील वर्गांना सुरुवात नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 12:08 AM2019-07-03T00:08:23+5:302019-07-03T00:09:55+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने २०१९-२० या शैक्षणिक वर्षाकरिता जाहीर केलेल्या शैक्षणिक कॅलेंडरनुसार १५ जूनपासून विद्यापीठाचे नवीन सत्र सुरू होणे अपेक्षित होते. परंतु अनेक अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर झाले असूनदेखील सत्र सुरू झाल्यावरदेखील बहुतांश पदव्युत्तर विभागांतमध्ये वर्गच सुरू झाले नसल्याचे चित्र आहे. अशा स्थितीत ९० दिवसांच्या नियमाचे पालन नेमके कसे होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Nagpur University: Even after the commencement of the session classes do not start | नागपूर विद्यापीठ : सत्र सुरू होऊनदेखील वर्गांना सुरुवात नाही

नागपूर विद्यापीठ : सत्र सुरू होऊनदेखील वर्गांना सुरुवात नाही

Next
ठळक मुद्देशैक्षणिक ‘कॅलेंडर’चा मुहूर्तच चुकला

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने २०१९-२० या शैक्षणिक वर्षाकरिता जाहीर केलेल्या शैक्षणिक कॅलेंडरनुसार १५ जूनपासून विद्यापीठाचे नवीन सत्र सुरू होणे अपेक्षित होते. परंतु अनेक अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर झाले असूनदेखील सत्र सुरू झाल्यावरदेखील बहुतांश पदव्युत्तर विभागांतमध्ये वर्गच सुरू झाले नसल्याचे चित्र आहे. अशा स्थितीत ९० दिवसांच्या नियमाचे पालन नेमके कसे होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
गेल्या ३ वर्षांपासून विद्यापीठाच्या निकालांनी वेग पकडला आहे. यंदादेखील अनेक दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील अनेक परीक्षांचे निकाल लागले आहे. विद्यापीठाने जारी केलेल्या शैक्षणिक कॅलेंडरनुसार वार्षिक प्रणालीच्या अभ्यासक्रमांचे पहिले सत्र १५ जून ते १५ ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे. मात्र निकाल लागले असूनदेखील अनेक वर्ग अद्यापदेखील सुरु झालेले नाहीत. ‘लोकमत’ने शहरांतील निरनिराळ्या महाविद्यालयांत जाऊन बघितले असता बऱ्याच ठिकाणी शांतता दिसून आली. बरेच शिक्षक प्रवेश प्रक्रियेमध्ये व्यस्त आहेत तर ‘कॅम्पस’मधील काही विभागातच वर्ग सुरू झालेले दिसून आले.
सत्र पूर्ण होणार कसे ?
सेमिस्टर पॅटर्ननुसार महाविद्यालयांना ऑक्टोबर महिन्यापर्यंत अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार आहे. युजीसीच्या नियमांनुसार सेमिस्टर सत्रात किमान ९० दिवसांचे शैक्षणिक सत्र व्हायला हवे. मात्र निकाल लागूनदेखील वर्ग सुरू झालेले नाहीत. अशा स्थितीत सत्र कसे पूर्ण होणार हादेखील एक प्रश्नच आहे. कागदावर जरी १५ जून रोजी शैक्षणिक सत्र सुरू झाले असले, तरी प्रत्यक्ष वर्गखोल्यांत विद्यार्थी येण्यास विलंब होणार हे निश्चित असल्याचे महाविद्यालयांकडूनच सांगण्यात येत आहे.

Web Title: Nagpur University: Even after the commencement of the session classes do not start

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.